-
शनिदेव हा आपल्याला कर्माचं फळ देतो. ज्या लोकांनी चांगले कर्म केले त्यांच्यावर शनी प्रसन्न असतो पण ज्यांचे कर्म वाईट असतं त्यांच्यावर शनिची वक्रदृष्टी असते, असे बोललं जातं.
-
शनि जयंती म्हणजे शनिदेवाचा जन्मदिवस. न्यायाधिकारी शनिदेवाची यंदाची जयंती १९ मे २०२३ ला जुळून आली आहे.
-
योगायोगाने हा दिवस अत्यंत शुभ व लाभदायक असल्याचे वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी सांगितले आहे. याच दिवशी तब्ब्ल पाच मोठे राजयोग जुळून आले आहेत.
-
शनि जयंतीपासून शनिदेवाच्या कृपेने काही राशींना चांगले दिवस अनुभवता येऊ शकते. त्यांच्यासाठी धन आणि प्रगतीचे योग बनू शकते. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आहे. शुक्र व शनी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामुळेच शनिदेवाची नेहमीच वृषभ राशीवर कृपा असल्याचे मानले जाते.
-
शनी जयंती ही वृषभ राशीला अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. येत्या काळात आपल्याला समाजात मान- सन्मान प्राप्त होऊ शकतो. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
-
कर्क राशीच्या मंडळींवर सुद्धा शनिदेवाची अमाप कृपा राहू शकते. तुमचा आर्थिक त्रास बर्याच प्रमाणात कमी होईल. नोकरदार लोकांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. यासह कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
-
दुसरीकडे, व्यावसायिकांना या काळात चांगली ऑर्डर मिळून नफा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुमच्यासाठी जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग बनू शकतात.
-
तूळ राशीचे स्वामी सुद्धा शुक्रदेव आहेत. या राशीत शनिदेव उच्च स्थानी आहेत. परिणामी तुम्हाला तुमच्या कष्टाचे दुप्पट फळ मिळण्याचा असा हा कालावधी ठरू शकतो.
-
शनिदेवाच्या कृपेने या राशींच्या लोकांना धन आणि समृद्धी मिळू शकते. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकतात. समाजात मान, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. यासोबतच तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
शनी हे मकर राशीचे सुद्धा स्वामी आहेत, या राशीवर शनिदेवाची प्रेमळ दृष्टी असल्याने तुम्हाला येत्या काळात चांगला लाभ मिळवता येऊ शकतो.
-
मकर राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये भरीव यश मिळू शकते आणि आर्थिक लाभही मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.
-
कुंभ ही स्वतः शनिच्या स्वामित्वाची रास असल्याने कुंभ राशीत शनिदेवाची कृपा कायम अनुभवता येऊ शकते. यंदा ३० वर्षांनी पहिल्यांदाच शनीदेव जयंतीला आपल्या स्व-राशीत असणार आहेत. यामुळे तुमच्या कुंडलीत साडेसाती सुरु असतानाही प्रचंड धनलाभ होण्याचा योग आहे.
-
हा काळ व्यावसायिकांसाठी अतिशय अनुकूल असणार आहे. लाभाची शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यासोबतच तुम्ही या कालावधीत पैसेही जोडू शकाल.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”