-
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट वापरतो.पण अनेक घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेला चमकदार बनवू शकता. हे उपाय मुरुम घालवण्यास व काळी वर्तुळे दूर करण्यास मदत करतात.
-
असाच एक उपाय म्हणजे डोळ्यांखाली थंड दूध लावणे, जे डोळ्यांच्या सुरकुत्या आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते असे मानले जाते. तज्ज्ञ काय म्हणतात, ते जाणून घेऊयात.
-
दुधामध्ये व्हिटॅमिन ए आणि डी, लॅक्टिक अॅसिड आणि प्रथिने यासह विविध पोषक घटक असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. थंड दुधाचा त्वचेवर चांगला परिणाम होतो आणि चेहऱ्यावरील सूज कमी होते.
-
थंड तापमानामुळे रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात, ज्यामुळे काळी वर्तुळे दिसणं कमी होते. लॅक्टिक अॅसिड मृत त्वचेच्या पेशींना एक्सफोलिएट करून त्वचेला चमकण्यास मदत करते.
-
काळी वर्तुळं बहुतेकदा आनुवंशिकता, झोप आणि जीवनशैली या कारणांमुळे येतात.
-
थंड दूध लावल्यास डोळ्यांखालील तात्पुरती सूज कमी होते, परंतु हा दीर्घकालीन उपाय नाही. फोटो – पिक्साबे
-
घरगुती उपाय लक्षणीय किंवा दीर्घकालीन परिणाम देऊ शकत नाही. अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फायद्यांसाठी योग्य स्किनकेअर रुटीन आवश्यक आहे.
-
यामध्ये सनस्क्रीन, मॉइश्चरायझर्स आणि रेटिनॉल, हायलुरोनिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या घटकांसह उत्पादनांचा समावेश आहे.
-
नैसर्गिकरीत्या काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हे करा: पुरेशी झोप घ्या: थकव्यामुळे होणारी काळी वर्तुळं कमी करण्यासाठी दररोज रात्री ७-९ तासांची चांगली झोप घ्या.
-
स्किनकेअर उत्पादने वापरा: सुरकुत्या आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रेटिनॉल, हायलुरोनिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी सारख्या घटकांसह आय क्रीम किंवा सीरम वापरा.
-
निरोगी जीवनशैलीचे जगा: संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि हायड्रेटेड राहणे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.
-
सनबर्न टाळा: सनस्क्रीन वापरा आणि उन्हामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सनग्लासेस घाला. कारण उन्हामुळे डोळ्यांखाली सुरकुत्या आणि काळी वर्तुळे येऊ शकतात.

Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…