-
सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठल्यामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. (Photo: Freepik)
-
काही लोकांना सकाळी लवकर उठावसं वाटतं, पण खूप प्रयत्न करूनही त्यांना सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. (Photo: Freepik)
-
तुम्हालाही सकाळी उठायची सवय लावायची असेल तर फक्त तीन कामं करा. या तीन टिप्सच्या मदतीने तुम्हाला दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय लागू शकते. (Photo: Freepik)
-
सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही पहाटे ४ किंवा ५ वाजता अलार्म लावत असाल तर ही सवय सोडून द्या. याऐवजी रात्री ९ वाजता अलार्म लावा. ९ वाजेपर्यंत सर्व कामे पूर्ण करून बेडवर झोपायला जा. (Photo: Freepik)
-
सुरुवातीला काही दिवस तुम्हाला ९ वाजता झोप येणार नाही, पण काही दिवसांनंतर तुम्हाला ९ वाजता झोप येणार, ज्यामुळे कोणताही अलार्म न लावता तुम्हाला सकाळी ४ किंवा ५ वाजता जाग येऊ शकते. (Photo: Freepik)
-
९ वाजता झोपताना स्वत:ला टीव्ही, मोबाईल, लॅपटॉपपासून दूर ठेवा; ज्यामुळे तुम्हाला वेळेवर झोपणे सोपे जाईल. (Photo: Freepik)
-
सकाळी उठण्यासाठी ध्येय असणे अत्यंत आवश्यक आहे. उदा. सकाळी उठून तुम्हाला व्यायाम करायचा आहे, अभ्यास करायचा आहे किंवा नवीन काहीतरी शिकायचं आहे; इत्यादी गोष्टींमुळे तुम्ही सकाळी लवकर उठण्यासाठी स्वत:ला प्रेरित करू शकता. (Photo: Freepik)
-
वजन कमी करण्यासाठी रात्री कमी खावे, असे तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. सकाळी लवकर उठण्यासाठीसुद्धा हा नियम लागू होतो. रात्री भरपूर जेवण केल्यामुळे अन्न पचवायला वेळ लागतो, ज्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही. (Photo: Freepik)
-
अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला सकाळी उशिरा उठावसं वाटू शकते. त्यामुळे रात्री खूप कमी खाण्याचा प्रयत्न करावा. (Photo: Freepik)

Daily Horoscope: श्रावणाची सुरुवात ‘या’ तीन राशींना देणार भरघोस लाभ; कोण संकटमुक्त तर कोणाच्या कुंडलीत पडणार पैशांचा पाऊस? वाचा राशिभविष्य