-
पैसा कमावणे ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही. (Photo : Freepik)
-
एक चांगले जीवन जगण्यासाठी जवळ भरपूर पैसा असणे खूप गरजेचे आहे; पण त्याबरोबरच पैशांची बचतही तितकीच महत्त्वाची आहे. (Photo : Freepik)
-
अनेक लोकांना पैशाची बचत कशी करावी, हे कळत नाही. त्यामुळे अनेकदा अशा लोकांच्या हातून खूप पैसा खर्च होतो. आज आपण जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करावी, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
पैसा वाचवायचा असेल, तर सुरुवातीला महिन्याचे बजेट ठरवा आणि त्या बजेटनुसार पैसा खर्च करा. बजेटच्या मदतीने पैसा कुठे जास्त खर्च करायचा आणि कुठे कमी ते तुम्हाला लगेच समजेल. मग त्यानुसार तुम्ही महिनाभराचे नियोजन करू शकाल. (Photo : Freepik)
-
पैशांची बचत करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी, म्युच्युअल फंड आणि योजनांमध्ये जास्तीत जास्त पैसा गुंतवा. दर महिन्याला तुम्ही यामध्ये पैसे गुंतवत असाल, तर दीर्घकाळासाठी तुम्हाला याचा फायदा होईल. (Photo : Freepik)
-
ज्या कर्जांवर जास्त व्याज असेल, त्या कर्जांपासून लवकर मुक्त होण्याचा प्रयत्न करा. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही अनेकदा संकटात येऊ शकता. त्यामुळे क्रेडिट कार्डाचा वापर नेहमी सावधगिरीने करावा. (Photo : Freepik)
-
पैसा खर्च करताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. कोणताही अवाजवी खर्च करू नका. ऑनलाइन शॉपिंग करणारे लोक विचार न करता खर्च करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. कोणत्या गोष्टीवर किती पैसा खर्च करावा, याची जाणीव आपल्याला असायला हवी. (Photo : Freepik)
-
तुम्हाला पैसे उसने घेण्याची सवय असेल, तर ती आताच सोडा. चुकूनही पैसे उसने घेऊ नका. आपल्या गरजेनुसार पैसा खर्च करा. (Photo : Freepik)
-
उपभोगाच्या वस्तू खरेदी करताना आपली आर्थिक स्थिती समजून घ्या. आर्थिक परिस्थिती चांगली नसताना आवडी-निवडीला प्राधान्य न देता, गरजेला महत्त्व द्या. (Photo : Freepik)

American Student Visa : “…तर व्हिसा होईल रद्द”, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इशारा