-
स्तन हा महिलांच्या शरीरावरील महत्त्वाचा भाग आहे. अशावेळी ब्रा ही महिलांच्या कपड्यांधील महत्त्वाचे अंतर्वस्त्र मानले जाते. (Photo : Freepik)
-
खरं तर ब्रा घालावी की नाही ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अनेकदा महिलांना प्रश्न पडतो की आपल्या स्तनाच्या आरोग्यासाठी ब्रा घालणे, गरजेचे आहे का की ब्रा घालणे बंद करू शकतो? (Photo : Freepik)
-
आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
एका महिला डॉक्टरांनी ब्रा घालावी की नाही आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो का? याविषयी सांगितले आहे. (Photo : Freepik)
-
डॉ. तनया सांगतात, ” ब्रा घालणे किंवा न घालणे याचा आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. हा एक फॅशनचा प्रकार आहे.” (Photo : Freepik)
-
त्या पुढे सविस्तरपणे सांगतात, “ही आपली वैयक्तिक निवड आहे. काही महिलांना ब्रा घातल्यानंतर आपण सुंदर दिसतो, असे वाटते तर काही क्रिडा क्षेत्रात असलेल्या महिलांना ब्रा घातल्याशिवाय खेळणे, अशक्य वाटते.” (Photo : Freepik)
-
डॉ. पुढे सांगतात, “जर कुणाला घालायची इच्छा असेल तर घालावी ज्यांना ब्रा घालायला आवडत नाही, त्यांनी घालू नये.” (Photo : Freepik)
-
“ब्रा न घातल्याने तुमचे स्तन चांगले दिसणार नाही, असे नाही किंवा अंडरवायर ब्रा आणि ब्लॅक ब्रा मुळे तुम्हाला कॅन्सरसुद्धा होणार नाही.” (Photo : Freepik)
-
“खरं तर ब्रा घालणे किंवा न घालणे हा आपल्या आवडी निवडीचा एक भाग आहे” (Photo : Freepik)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या