-
Mobile Addiction: आजच्या डिजिटल काळात केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागले आहे. मोबाइलच्या या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण इतरही अनेक दुष्परिणाम होतात.
-
गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असण्यामुळे अनेकांना नैराश्य, चिंता सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो आणि ऑनलाइन सायबर क्राईमला मुले बळी पडू शकतात.
-
अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे हे व्यसन दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच काही टिप्स आहेत ज्या मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
-
मुलांच्या मोबाईलच्या व्यसनापासून सोडवण्याचे उपाय
स्क्रीन टाइम मर्यादित करा
मुले किती वेळ मोबाईल चालवू शकतात आणि त्याचा परिणाम वेळ ठरवण्यासाठी खूप गरजेचा आहे. -
मुलांना २ ते ५ वर्षांपर्यंत होऊ शकतो त्यामुळे स्क्रीन टाइम एक तासासाठी असला पाहिजे. ६ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना स्क्रिन टाइम आई-वडिल आपल्या हिशोबाने सेट करू शकतात
-
पालक म्हणून त्यांचा आदर्श व्हा
तुमच्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः एक चांगले आदर्श होऊ शकता. जेव्हा तुम्ही कोणतेही अन्न खाता किंवा मुलांबरोबर असता तेव्हा फोन न वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः फोनवर बिझी असाल तर मुलंही तसंच करतील. -
मनोरंजनासाठी दुसरे काहीतरी निवडा
मुलं फोन बहुतेक फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी मोबाइल वापरतात. जर तुम्ही मुलाला मनोरंजनासाठी मोबाईल दिला तर तो सगळा वेळ त्यातच वाया घालवतील. -
अशास्थितीमध्ये असे मोबाइलशिवाय इतर मनोरंजनाचे पर्याय निवडा जसे की, पुस्तक वाचा, गाणी ऐका, चित्र काढा.
-
संगणक अभ्यासासाठी चांगला आहे
मुलांना अभ्यासासाठी मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्यांना संगणक किंवा लॅपटॉप देऊ शकता. -
संगणक किंवा लॅपटॉपमध्ये सुरक्षा आणि अँटी-व्हायरस सेट करू शकता आणि मुले काय पाहत आहेत आणि काय नाही यावर पालक देखील चांगले निरीक्षण करू शकतात. (सर्व फोटो – फ्रिपीक)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल