-
आजकाल बदललेली जीवनशैली आणि धावपळीचे आयुष्य यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे विसरतो.
-
मात्र, याच निष्काळजीपणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. अशातच आपण आपल्या आहारात काही महत्त्वाचे बदल करून शरीराला पोषण देऊ शकतो.
-
दूध हे आरोग्यासाठी आणि शरीराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांसारखे असंख्य पोषक घटक असतात.
-
दुधाच्या सेवनामुळे शरीराला खूप फायदा होतो. विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी याची मदत होते.
-
मात्र, दुधामध्ये वेलचीची पूड मिसळून प्यायल्यास त्यातून दुप्पट फायदे मिळू शकतात. याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया.
-
वेलचीमध्ये असलेले पोषक घटक तोंडाची दुर्गंधी, तोंड येण्याची समस्या, अल्सर यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.
-
वेलची पूड घातलेल्या दुधामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण भरपूर असतं. यातील घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात.
-
दुध आणि वेलची पूड एकत्र करून प्यायल्यास शरीराला अधिक प्रमाणात कॅल्शिअमचा पुरवठा होतो. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
-
सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी वेलचीयुक्त दूध पिणे आरोग्यासाठी चांगले असते. यातील पोषण तत्त्वे सर्दी-खोकल्याची समस्या दूर करतात.
-
दूध आणि वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.
-
वेलचीमध्ये कॅन्सरच्या पेशींविरोधात लढणाऱ्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. यातील घटक शरीरामध्ये कॅन्सर पेशींची निर्मिती रोखण्यास मदत करू शकतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL