-
आरोग्य निरोगी ठेवणे फार आवश्यक असते. सकाळी लवकर उठणे आणि झोपेतून उठल्यानंतर फ्रेश होत सकस नाश्ता करणे उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
-
नाश्त्यात काही पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहता. त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्हीला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करतात जाणून घेऊ…
-
जायफळ
रिकाम्या पोटी जायफळ पावडरचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी जायफळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. -
जायफळ
अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी जायफळाचे सेवन खूप प्रभावी आहे.जायफळ हे अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सूज कमी करण्यास मदत होते. -
हलीम बिया
हलीमच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते ज्यामुळे शरीराला पोषण आणि ऊर्जा मिळते. रक्त शुद्ध होते, हाडांचे आरोग्य निरोगी राहते, श्वसन आरोग्य सुधारते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. -
मेथी दाणे आणि आलं
मेथी दाणे हा मसाल्यातील असा एक पदार्थ आहे ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते. मेथीचे सेवन केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता वाढते. तर आलं अतिरिक्त चरबी नियंत्रित करते आणि पचनक्रिया सुधारते. -
अंजीर
भरपूर फायबर असलेल्या अंजीराचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीरमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. -
अंजीर
सकाळी नाश्त्याच्या आधी अंजीर खाल्ल्याने भूक कमी होते आणि शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यामध्ये लोह, फोलेट आणि फायबर भरपूर असल्याने गर्भवती महिलांसाठी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर ते प्रभावी ठरते

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case