-
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला डिटॉक्स करणे व हायड्रेटेड ठेवणे अत्यावश्यक आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर पाणीदार भाज्या, फळे खाऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखून ठेवणे आणि अनावश्यक घटक शरीरातून बाहेर टाकत राहणे हे गरजेचे आहे
-
वरील दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी काकडी ही सुपरफूड ठरू शकते. अनेकदा आपण काकड्या विकत घेतो पण त्या चवीला कडू असल्यास खाण्याची इच्छा छूमंतर होते. पैसे वाया जातात हा तर भाग वेगळाच. आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे खरेदी करतानाच तुम्हाला ताज्या काकड्या विकत घेता येतील
-
गडद हिरव्या रंगाची आणि कडक काकडी निवडा. साधारण फिकट छटा असणाऱ्या किंवा पिवळसर काकड्या जुन्या व जास्त पिकलेल्या असतात. ज्या चवीला कडवट लागू शकतात
-
तुम्ही खरेदीला जाता तेव्हा भाजी हातात घ्या व हलके दाबून पाहा. तुम्हाला कुठेही काकडी नरम झालेली जाणवली तर खरेदी करू नका. जर तुमच्या बोटाच्या दाबाने काकडी तुटत असेल तर ती काकडीत बिया व रस जास्त असल्याचे समजून जा. अधिक जुनाट बिया या कडवट लागतात.
-
दुर्दैवाने, भाज्या जास्त काळ टिकण्यासाठी, बरेच उत्पादक भाज्यांच्या वर मेण लावतात. त्यामुळे तपासण्यासाठी तुमच्या नखांचा वापर करून काकड्या किंचित खरडवून पहा. अशा काकड्या चवीला कडू असू शकतात
-
आकाराने लहान आणि बारीक काकडी निवडा. लहान काकड्या ताज्या असतात आणि त्यात कमी बिया असतात.
-
काकडी सरळ आकाराची असेल असे बघा. वाकड्या काकड्या चवीला कडू शकतात
-
युट्युबवर @Parabkitchen895 या चॅनेलवरून हिरवी गावठी काकडी कडू असल्यास काय उपाय करता येईल हे सांगितले होते. त्यानुसार, तुम्ही सर्वात आधी या काकडीचे निमुळते होणारे टोक कापायचे आहे आणि मग ते टोक काकडीच्या त्याच टोकावर घासायचे आहे
-
हळूहळू काकडीला फेस येऊ लागेल हा फेसच मुळात कडवाटपणाचे कारण आहे. त्यामुळे हा फेस बाहेर पडल्यावर काकडी नीट धुवून घेतल्यास गोडवा येऊ शकतो. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“शाळकरी मुलांवर गोळ्या झाडल्या, महिलांवर बलात्कार आणि…”; नेपाळच्या इन्फ्लुएनर्सचे धक्कादायक दावे