-
Home gardening tips : स्वयंपाकात पदार्थाची चव वाढविणारी कोथिंबीर बाहेरून आणल्यावर अगदी एका दिवसात खराब होते किंवा वाळून जाते. मात्र, घरातच तुम्हाला दररोज ताजी आणि कोवळी कोथिंबीर मिळाली, तर ते अधिक सोईचे होईल नाही का? घरच्या घरी कोथिंबीर कशी लावायची, तिची काळजी कशी घ्यायची यासाठी MaziRecipeMaziBaag या यूट्युब चॅनेलने कोथिंबीर लागवडीबाबत काही सोप्या आणि महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या पाहू.[Photo credit – Freepik]
-
कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी जुन्या धण्यांचा अजिबात वापर करू नका. त्याऐवजी ताजे किंवा नवे धणे वापरावेत. तुम्ही जर जुन्या धण्यामध्ये रुजवण क्षमता कमी असते. परिणामी कोथिंबीर नीट उगवणार नाही किंवा त्या लागवडीचे हवे तसे परिणाम दिसणार नाहीत.[Photo credit – Freepik]
-
नवीन धणे कुंडीमध्ये टाकण्याआधी हातावर चांगल्या रीतीने मळून घ्यावेत. धण्याचे दोन भाग होईपर्यंत ते हातावर मळून घ्यावेत. हातावर मळून घेतलेले धणे कुंडीत लावण्याआधी किमान दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावेत. [Photo credit – Freepik]
-
दोन तास पाण्यात भिजवून घेतलेले हे धणे कुंडी वा मातीमध्ये एका ओळीत किंवा एकत्रित पुंजका पद्धतीने लावून घ्या. लागवड केलेल्या धण्यांना अंकुर फुटून, कोथिंबीर उगवू लागली की, झारीच्या मदतीने आरामात पाणी द्या. उगवलेल्या कोथिंबिरीला आवश्यकतेनुसार किंवा साधारण एक दिवसाआड पाणी द्यावे. [Photo credit – Freepik]
-
कोथिंबीर लागवड केलेली कुंडी वा ती जागा जास्त सूर्यप्रकाश असेल अशा ठिकाणी असू नये. दिवसभरातून साधारण एक तासभर ऊन मिळाले तरीही कोथिंबिरीसाठी ते पुरेसे होते. त्यामुळे कोथिंबिरीची कुंडी त्याप्रमाणे स्वयंपाकघरात किंवा बाल्कनीत ठेवावी. [Photo credit – Freepik]
-
कोथिंबिरीचे स्वरूप लहान असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खत घालू नका. मात्र, तुम्ही कोथिंबीर ज्या मातीमध्ये लावणार आहात, ती माती कंपोस्ट खत किंवा शेणखत मिश्रित असावी. तसेच त्या मातीमधून पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. [Photo credit – Freepik]
-
जेव्हा तुम्हाला कुंडीतील कोथिंबीर वापरायची असेल तेव्हा केवळ तिची पाने तोडून घ्यावीत. त्यामुळे त्याच कुंडीत कोथिंबिरीचे रोप पुन्हा नव्याने वाढण्यास मदत होते. [Photo credit – Freepik]

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL