-
देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणं अवघड होत आहे. यात आता अनेकांच्या दैनंदिन आरोग्यासाठी आवश्यक औषधांच्या किमतीतही वाढणार आहे.
-
१ एप्रिलपासून देशातील जवळपास ८०० औषधांच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये वेदनाशामक, प्रतिजैविक आणि संसर्गविरोधी औषधांचा समावेश आहे.
-
वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकातील (WPI) बदलांनुसार सरकारने 0.0055 टक्क्यांपर्यंत दरवाढीला मंजुरी दर्शवली आहे. काही दिवसांत भाव वाढ दिसून येईल. वर्षातून एकदाच औषधाची किंमत वाढू शकते.
-
अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी (NLEM) अंतर्गत, २०२३ आणि त्यापूर्वी २०२२ मध्ये औषधांच्या किमतीत अनुक्रमे १२ टक्के आणि १० टक्क्यांनी वाढ झाली होती.
-
गेल्या काही वर्षांत औषधात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीही वाढल्या होत्या. त्यातही १५ ते १३० टक्के वाढ झाली आहे.
-
पॅरासिटामॉल १३० टक्क्यांनी वाढले आहे तर एक्सपिएंट्सच्या किमती १८-१२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याशिवाय अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत.
-
औषध उद्योग समूहांचे सदस्यांच्या माहितीनुसार, औषधांच्या निर्मितीचा खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे त्याची किंमतही वाढते. त्यात डबल डिजिट वाढ होत आहे.
-
आता दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. औषधे ही अशी गोष्ट आहे जी बहुतेक लोकांसाठी आवश्यक आहे. यात पॅरासिटामॉल, अजिथ्रोमायसिन आणि व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या औषधांचा समावेश आहे.
-
औषधांच्या या यादीमध्ये पॅरासिटामॉल, ॲझिथ्रोमायसीन अँटीबायोटिक्स, ॲनिमियाविरोधी औषधे, व्हिटॅमिन आणि आयरन यांचा समावेश आहे. कोविड-19 आजारामध्ये वापरण्यात येणारी औषधे आणि स्टिरॉइड्सचा देखील या यादीत समावेश आहे.
-
पॅरासिटामॉलच्या किमतीत १३० टक्क्यांनी वाढ झाली असून एक्सपिएंट्सच्या किंमतीत १८-२६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-
ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉल, सिरपसह सॉल्व्हेंट्स अनुक्रमे २६३ टक्के आणि ८३ टक्क्यांनी महाग झाले आहेत. इंटरमीडिएट्सची किंमत ११ ते १७५ टक्क्यांच्या दरम्यान वाढल्या आहेत. तर पेनिसिलिन जी १७५ टक्क्यांनी महाग झाले आहे.

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग