-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला एका विशिष्ट वेळी काही ग्रह त्यांचं स्थान बदलतात आणि त्याचा परिणाम सर्व बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो.
-
ग्रह वेळोवेळी गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
नुकतीच कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनिदेवाची युती घडून आली होती. याचा अशुभ प्रभाव पडून काही राशींवर याचा नकारात्मक प्रभाव पडत होता. परंतु १४ मार्च रोजी ही युती संपली आहे. कारण आता सूर्यदेवाने मीन राशीत प्रवेश केला आहे.
-
त्यामुळे काही राशींसाठी अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहेत, पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
सूर्य शनिदेवाची युती संपल्याने वृषभ राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.
-
मकर राशीच्या लोकांना सूर्य शनिदेवाची युती संपल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकतो. हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरु शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
-
सूर्य शनिदेवाची युती संपल्याने कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य:लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय