-
Banana peel Benefits: केळ आरोग्यासाठी खूप फायेदशीर असते. त्यामध्ये कित्येक प्रकारचे पोषकत्तव असतात, जे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर असतात. सामन्यत: लोक केळ खाऊन त्याची साल कचऱ्यात फेकून देतात.
-
पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, फक्त केळ नव्हे तर त्याची साल देखील तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घ्या केळाची साल तुमचे घर चमकवण्यासाठी वापरू शकता.
-
तांब्याची भांडी चमकवा
तांब्याची भांडी घरांमध्ये पुजेसाठी वापरली जातात. पाण्याच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे ते काळे पडतात. केळीच्या सालीचे पाणी ही भांडी चमकण्यासाठी वापरू शकता. -
यासाठी केळीची साल पाण्यात टाकून चांगले उकळवून घ्या. ते थंड झाल्यावर या पाण्यात तांब्याची भांडी अर्धा तास भिजत ठेवा. असे केल्यावर तांब्याच्या भांड्याचे काळे डाग गायब होतील आणि भांडी चमकदार होतील.
-
भांड्याचा तेलकटपणा निघून जाईल
साधारणपणे प्रत्येक घरात तेल आणि तूपासाठी वापरली जाणारी तेलकट तुपट भांडी धुणे सोपे नसते. पण केळीच्या सालीपासून बनवलेले आश्चर्यकारक पाणी तुमच्या घरातील प्रत्येक भांड्याचा तेलटकपणा काढून टाकेल. केळीच्या सालीचे हे मिश्रण बनवण्यासाठी सर्वप्रथम साले टाकून पाणी उकळावे लागेल. पाणी कमी होईपर्यंत उकळावे लागेल. -
पाण्याचा रंग बदलल्यानंतर त्यापासून केळीची साल वेगळी करा. नंतर या पाण्यात सर्व तेल लावलेली भांडी काही वेळ सोडा. यानंतर, जेव्हा तुम्ही भांडी साबणाने स्वच्छ करता तेव्हा तुम्हाला ते तेलकट दिसणार नाहीत.
-
दुधाच्या भांड्यातून वास येणार नाही
दुधाच्या भांड्यांना बऱ्याचदा दुर्गंधी येते, मग ते दूध उकळण्याचे भांडे असो किंवा दुधाचा ग्लास. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्याचा उपाय देखील केळाची सालच आहे. दुधाचा वास दूर करण्यासाठी त्या भांड्यांमध्ये केळीच्या साली उकळवलेले गरम पाणी ठेवावे लागेल. -
असे केल्यावर भांडी झाकून ठेवा. यानंतर, जेव्हा तुम्ही भांडी धुता तेव्हा तुम्हाला दिसेल की वास नाहीसा झाला आहे.

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक