-
लसूण हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध एक औषधी वनस्पती आणि मसाला आहे, ज्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यास अनेक फायदे मिळतात. लसणाचा वापर औषधांपासून ते स्वयंपाकापर्यंत प्रत्येक गोष्टीत केला जातो
-
लसणात प्रथिने, फॅट्स, खनिजे आणि लोह असे पोषक तत्व असताता जे आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. याशिवाय लसणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड विशेष प्रमाणात आढळते.
-
लसूण हा एक असा मसाला आहे ज्याचे सेवन त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
-
लसणाचे सेवन केल्याने रक्त स्वच्छ राहते आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी लसणाचे सेवन खूप प्रभावी ठरते.
-
अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या लसणाचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते आणि हृदयविकारांपासून बचाव होतो.
-
उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी लसणाचे सेवन केल्यास त्यांचे बीपी सहज नियंत्रित ठेवता येते. औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या लसणाची साले काढून त्याचा वापर केला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का, की लसणाप्रमाणेच त्याची सालेही आरोग्यासाठी गुणकारी ठरतात.
-
लसणाचे सेवन जितके प्रभावी आहे तितकेच लसणाची साल देखील प्रभावी आहे. ही साले फेकून देऊ नका तर त्यांचे सेवन करा. लसणाच्या सालींचे सेवन कसे करावे हे तज्ञांकडून जाणून घेऊया.
-
लसूण साल आहारात कशी वापरावी
अनेकदा आपण लसूण वापरतो आणि त्याची साले फेकून देतो. तज्ज्ञांच्या मते, लसणाची साले टाकाऊ नसून ती उपयुक्त आहेत. लसणाची साले फेकून देऊ नका तर वापरा. तज्ञांनी सांगितले की, “आपण लसणाच्या सालीपासून खत बनवू शकता आणि ते अन्नात देखील घेऊ शकता. लसणाच्या सालीची पावडर घरीच बनवून त्याचा जेवणात वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.” -
क्लिनिकल डायटीशियन गरिमा गोयल यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, लसणाच्या सालीची पावडर बनवण्यासाठी लसणाची साले एकत्र करून वाळवून घ्या. ही साले बारीक करून त्याची पावडर बनवा. यामुळे अन्नाची नासाडी कमी होईल आणि लसणाची पेस्ट घरी मोफत तयार करू शकता. घरगुती लसूण पावडर ताजे असेल आणि जेवणाची चव आणि गुणवत्ता दोन्ही सुधारेल.
-
घरी लसूण पावडर कशी बनवायची
घरच्या घरी लसणाची पावडर बनवून तुम्ही लसणाच्या सालींचा उत्तम वापर करू शकता. तज्ज्ञांच्या मते, लसणाच्या सालीचे सेवन करण्यासोबतच त्याचा औषध म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. लसणाच्या सालींमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जर तुम्हाला तुमच्या पायावर सूज आल्याने त्रास होत असेल तर लसणाची साल पाण्यात उकळून घ्या आणि त्या पाण्याने पाय धुवा. -
लसूण पावडर बनवण्यासाठी प्रथम लसूण साले गोळा करा. ताज्या लसणाच्या पाकळ्यांची साले वाळवा. सुकवण्यासाठी साल ट्रे किंवा स्वच्छ जागी पसरवा आणि त्यांना अनेक दिवस हवेत सुकू द्या. लसणाची साले लवकर वाळवायची असतील तर ओव्हनचाही वापर करू शकता. ही साले बारीक करून पावडर होईल. जर तुम्ही ते तुमच्या जेवणात सेवन केले तर तुमचे जेवण रुचकर होईल. (सर्व फोटो सौजन्य – फ्रिपीक)

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”