-
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा अन् तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे लग्नासाठी वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय फार उत्साही असतात.
-
पण लग्न जमवताना सर्वांत आधी दोघांची कौटुंबिक स्थिती, उत्पन्न व सौंदर्य अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात.
-
त्यानंतर वधू-वरांच्या कुंडल्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिले जाते. त्यात हल्ली कुंडलीबरोबरच रक्तगटाबाबतही चौकशी केली जाते.
-
पण याबरोबर तुमचे लग्नाचे वय जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही तितकेच महत्वाचे असते. ते का याचे उत्तर आपण महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी लोकसत्ता डॉट कॉमला दिलेली माहितीवरुन जाणून घेऊ..
-
तुम्ही अनेकदा पाहता की, थोरल्या मुलापेक्षा दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरचे मूल हे हुशार असते. म्हणजे आई-वडील जेवढे परिपक्व असतील तेवढे होणारे मूल हे बुद्धिमान असते, असे म्हटले जाते;
-
परंतु त्यालाही वयाच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे असे नाही की, ५० व्या वर्षी अपत्यप्राप्ती निर्णय द्यावा.
-
तसेच वयाच्या पस्तिशीनंतर बाळाला जन्म दिल्याने डाउन सिंड्रोमचा धोका वाढतो. याचा अर्थ प्रत्येक बाळाला असे होईल असे नाही पण प्रमाण वाढते त्यात हल्ली लग्न उशिरा करण्याचे प्रमाण वाढतेय.
-
त्यामुळे पस्तिशीआधी अपत्यप्राप्ती होणे योग्य ठरू शकते. त्यासाठी काही विशिष्ट नियम किंवा सक्ती नाही;
-
पण वाढत्या वयाबरोबर वाढत्या आरोग्य समस्या लक्षात घेता, योग्य वयात अपत्य होणे गरजेचे आहे. (photos credit – freepik)

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…