-
पूर्वी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात, जिलेबी आणि मठ्ठा अगदी हमखास असायचे. हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्येही मोठे वैविध्य आढळते. (फोटो : Cookpad)
-
पण अजूनही लग्नमंडपात शिरलं की भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवाहवासा वाटतो. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. (फोटो : Cookpad)
-
काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. अशीच एक आगळी वेगळी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.(फोटो : Cookpad)
-
गाजराचा भातासाठी साहित्य २ मोठे गाजर, ४ हिरव्या मिरच्या, गरम मसाला, दोन लवंगा, चार काळी मिरी, एक वेलदोडा, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, फोडणीसाठी जीरे मोहरी, हिंग कढीपत्ता, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १/४ वाटी, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा, १/२ चमचा गरम मसाला, २ चमचे तूप, १ चमचा तेल (फोटो : Freepik)
-
प्रथम गाजराची साल काढून एक गाजर किसून घ्यावा आणि एका गाजराच्या बारीक फोडी कराव्यात. नंतर तांदूळ धुऊन घ्यावेत. (फोटो : Freepik)
-
गॅसवर कुकर ठेवा यामध्ये दोन चमचे तूप, एक चमचा तेल घाला. जीरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी करा. नंतर आले लसूण पेस्ट परतून घ्या, कांदा बारीक कट करून परतून घ्या, त्यानंतर टोमॅटो परतून घ्या हिरवी मिरची परतून घ्या यामध्येच खडे मसाले टाका.(फोटो : Freepik)
-
कांदा टोमॅटो गुलाबीसर झाल्यानंतर यामध्ये गाजराचे तुकडे गाजराचा कीस हिरवा मटार अशा भाज्या टाकत दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. (फोटो : Freepik)
-
त्यानंतर तांदूळ परता यामध्ये लाल तिखट मीठ गरम मसाला हे सर्व घालून परता आणि भातामध्ये गरम पाणी घालून झाकण लावून दोन शिट्ट्या करा.(फोटो : Freepik)
-
पंधरा मिनिटं कुकर थंड होऊ द्या. गरम गरम भात दह्यासोबत किंवा लोणच्या पापड सोबत सर्व्ह करा.(फोटो : Freepik)

Raja Gosavi : “पितळी भांडी विकून गुजराण, ब्रेड आणि आमटी…” राजा गोसावींच्या मुलीने उलगडली सुपरस्टारची हलाखी