-
उपवास असला की आपण आवडीने साबुदाणा खिचडी करतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपवासाला न चुकता साबुदाणा खिचडी हवी असते. (Photo : Social Media)
-
अनेकदा साबुदाणा खिचडी मोकळी किंवा सुटसुटीत होत नाही. खिचडी चिकट होते. तुमचीही खिचडी मोकळी होत नाही का? (Photo : Social Media
-
टेन्शन घेऊ नका आज आपण मऊ व मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची, याबाबत काही टिप्स जाणून घेणार आहोत. (Photo : Loksatta)
-
सोशल मीडियावर साबुदाणा खिचडी कशी बनवायची, याविषयी आज आपण त्या जाणून घेऊ या (Photo : Loksatta)
-
साबुदाणा खिचडी मऊ आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा नीट भिजवून घ्यायचा. साबुदाणी दोन तीनदा धुवून पूर्ण पाण्यात साबुदाणा बुडेल, एवढे पाणी घालायचे. (Photo : Loksatta)
-
साबुदाण्याला सात आठ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवायचा. साबुदाणा भिजवल्यानंतर जास्त पाणी झाले तर साबुदाणा चाळणीमध्ये काढून फॅनच्या हवेमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर खिचडी बनवायची. (Photo : Social Media)
-
खिचडी बनवताना शक्यतो जाड कढईचा वापर करायचा. त्यामुळे खिचडी चांगली भाजली जाते आणि मऊ व्हायला मदत होते. साबुदाणा मोकळा करूनच मग कढईमध्ये घालायचा. (Photo : Social Media)
-
शेंगदाण्याचे कुट वापरताना जाडसर कुट त्यामध्ये वापरायचे त्यामुळे खिचडी छान मोकळी होते. (Photo : Social Media)
-
खिचडी भाजल्यानंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. यामुळे मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तयार होते. (Photo : Social Media)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”