-
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. (Photo : Social Media)
-
एवढंच काय तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अनेक पदार्थ त्या भागाची ओळख सांगतात. (Photo : Social Media)
-
आज आपण विदर्भातील अशाच एका खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत, ती म्हणजे विदर्भातील डाळभाजी. ही डाळभाजी तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात जेवणाच्या लिस्टमध्ये दिसेल. (Photo : Social Media)
-
ही डाळभाजी अत्यंत चविष्ठ आणि तितकीच लोकप्रिय आहे. आज आपण विदर्भातील डाळभाजी कशी बनवली जाते, हे जाणून घेणार आहोत. (Photo : Social Media)
-
१. एक मोठं पातेलं चुलीवर ठेवा.
२. त्यात थोडे तेल टाका.
३. तेलामध्ये हळद, शेंगदाणे, मीठ आणि बारीक चिरलेले खोबरे टाका. (Photo : Social Media) -
४. त्यानंतर त्यात पाणी टाका.
५. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली पालक टाका.
६. त्यानंतर त्यात थोडी कैरी टाका (Photo : Social Media) -
७. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाका.
८. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली चण्याची डाळ टाका. (Photo : Social Media) -
१०. त्यानंतर तडका देण्यासाठी एका दुसऱ्या भांड्यात तेल घेतले त्यात जिरे, मोहरी, तिखट ठेचा, आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेले कांदे टाका. (Photo : Social Media)
-
९. त्यानंतर त्यात टाकले आहे कढीपत्ता, मसाला, हळद, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेले टोमॅटो टाका.
१०. त्यानंतर यामध्ये आधीच्या पातेल्यातील डाळ आणि पालकचे मिश्रण टाका आणि विदर्भ स्टाइल डाळभाजी तयार होईल. (Photo : Social Media)

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल