-
जगात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा ट्रेंड हळूहळू कमी होत असताना, बहुतांश वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक, हायब्रीड आणि हायड्रोजनवर चालणारी वाहने बनवत आहेत. दरम्यान, भारतात प्रथमच हायड्रोजनवर चालणारे जहाज दाखल झाले आहे.
-
देशातील पहिले हायड्रोजन क्रूझ रविवारी रात्री उशिरा गंगा नदीमार्गे कोलकाताहून वाराणसीला पोहोचले. हे जहाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथून चालवण्यात येणार आहे. या जहाजाची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज वाराणसी ते चुनार दरम्यान धावणार आहे. पर्यटन विभागाच्या देखरेखीखाली हे जहाज चालवले जाईल. जर त्याचे ऑपरेशन यशस्वी झाले तर देशातील इतर अयोध्या आणि मथुरा सारख्या शहरांमध्ये देखील ते चालवले जाईल.
-
१० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे जहाज पूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालते. तथापि, या जहाजामध्ये एक इलेक्ट्रिक इंजिन देखील बसविण्यात आले आहे, ज्यामुळे हायड्रोजन इंधन संपल्यास ते इलेक्ट्रिक इंजिनने देखील चालवता येऊ शकते.
-
ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या या क्रुझमुळे ना वायुप्रदूषण होणार आहे ना ध्वनी प्रदूषण. त्याचबरोबर या हायड्रोजन क्रूझच्या ऑपरेशनमुळे गंगा नदीलाही कोणतीही हानी होणार नाही.
-
२० टन वजनाची ही क्रूझ कोचीच्या शिपयार्डमध्ये तयार करण्यात आली आहे. ही डबल डेकर आणि एसी क्रूझ अनेक सुविधांनी सुसज्ज आहे. या जहाजात ५० प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. हे जहाज २८ मीटर लांब आणि ५.८ मीटर रुंद आहे.
-
या जहाजाच्या संचालनासाठी बनारस टर्मिनलवर लवकरच ५०० किलो वजनाचा हायड्रोजन प्लांट बसवण्यात येणार आहे. येथून हायड्रोजन सिलिंडरमध्ये भरून जहाजापर्यंत पोहोचवले जाईल.
-
(Photos Source: Twitter/X)

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE : “…तर रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो”, राज्य सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावानंतर मनोज जरांगेंचा शब्द