-
पावसाळ्याच्या दिवसांत अनेक व्यक्तींना सांधेदुखीच्या समस्या जाणवतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आयुर्वेद चिकित्सक डॉ. मनीषा मिश्रा यांनी सांगितले की, हे दुखणं आणि वेदना शरीरातील वात किंवा हवेच्या प्रमाणात असमतोल झाल्यामुळे होते. पण यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण- त्यासाठी दोन उपाय आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यातील एक उपाय म्हणजे कोरड्या आल्याच्या पावडरचा चहा. हे वात कमी करण्यास मदत करणारे एक पेय आहे. त्यासाठी “कोरड्या आल्याची पावडर पाण्यात उकळून घ्या आणि ते पेय दिवसातून दोनदा सकाळ आणि संध्याकाळी प्या.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
तज्ञांनी सांगितले की, “थंड, ओलसर हवामानामुळे पाचन अग्नी अधिक कमकुवत होतो. त्यामुळे पचन नीट होत नाही आणि त्यामुळे विषारी पदार्थ शरीरात जमा होतात. पचन बिघडल्यामुळे शरीरात जमा होणारा आमयुक्त विषारी पदार्थ शरीराच्या विविध भागांमध्ये जळजळ आणि वेदनांना कारणीभूत ठरतो.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून, त्याची पेस्ट बनवा. पेस्ट प्रभावित भागात लावा आणि स्वच्छ कापडाने झाकून ठेवा. हे ३०-६० मिनिटे राहू द्या. नंतर स्वच्छ धुऊन घ्या. ही पेस्ट सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. यामुळेही सांधेदुखीचा त्रास कमी होईल. (फोटो सौजन्य: Freepik)



