-
लंच ब्रेकमुळे कामाचा ताण, डेडलाइन आणि जबाबदाऱ्यांपासून काही क्षण का होईना आराम मिळतो. त्यामुळे लंच ब्रेकमध्ये खाल्ले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी पौष्टिक असणेदेखील गरजेचे असतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
नोएडामधील एका शाळेने पालकांना अन्न सुरक्षेच्या कारणास्तव मुलांच्या टिफिनमध्ये फक्त शाकाहारी अन्न पदार्थ पाठवण्याचे आवाहन केले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यामुळे आता मांसाहारी पदार्थ खराब होण्याआधी टिफिनध्ये किती काळ सुरक्षितपणे साठवले जाऊ शकतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात “इंडियन एक्स्प्रेस”ने आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
मल्होत्रा यांनी सांगितले की, “मांसाहारी पदार्थ, मटण, चिकन आणि सीफूडमध्ये पोषक आणि आर्द्रता असते, जी जीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ज्यामुळे साल्मोनेला, ई. कोलाय, कॅम्पिलोबॅक्टर आणि लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सची वाढ सहज होते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा मांसाहारी पदार्थ टिफीनमध्ये पॅक केले जातात आणि बरेच तास ते तुमच्या बॅगेमध्ये नॉर्मल टेंपरेचरवर असतात. हे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घातक ठरू शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कारण या काळात खोलीचे तापमान सहजपणे २० अंश सेल्सिअस (६८°F) पेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत सॅल्मोनेला आणि स्टॅफिलोकोकस ऑरियससारखे जीवाणू शिजवलेल्या चिकन किंवा इतर मांसाहारी पदार्थांमध्ये वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कच्च्या किंवा कमी शिजलेल्या मांसाहारी पदार्थांमध्ये बॅक्टेरिया (कॅम्पायलोबॅक्टर, साल्मोनेला, स्टॅफिलोकोकस ऑरियस) असू शकतात, जे योग्यरीत्या साठवले नसल्यास यातील धोका त्वरीत वाढू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
क्रीम किंवा डेअरीआधारित सॉसमध्ये शिजवलेले मांस किंवा पोल्ट्री (जसे की बटर चिकन) डेअरीच्या नाशवंत स्वरूपामुळे जलद खराब होतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चिकन सॉसेजेस आणि चिकन सलामी यांसारख्या पदार्थांमध्ये ओलावा कमी असतो आणि त्यावर अनेकदा संरक्षकांनी उपचार केलेले असतात, ज्यामुळे त्यांच्यात बॅक्टेरियाच्या वाढीचे प्रमाण कमी होते. कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यांच्या तुलनेत कडक उकडलेली अंडी खराब होण्याची शक्यता कमी असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“मांसाहारी अन्न पॅक केल्याच्या दोन तासांच्या आत किंवा वातावरणातील तापमान ३० अंश सेल्सिअस (८६° F) पेक्षा जास्त असल्यास एका तासाच्या आत खावे,” असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. (फोटो सौजन्य: Freepik)

Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”