-
हल्ली अनेकांना कोणतेही काम करताना इअरफोनवर गाणी ऐकण्याची सवय लागली आहे. महिला, तरुण मंडळी, वयोवृद्ध यांसारख्या प्रत्येक वयोगटातील लोकांना सातत्याने इअर फोनवर गाणी ऐकण्याची किंवा रील्स बघण्याची सवय लागली आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अनेक जण जिममध्ये जिम करतानादेखील इअरफोन लावून गाणी ऐकताना दिसतात. जिममध्ये तुम्ही नियमितपणे डेड लिफ्ट करताना इअरफोनचा वापर करीत असाल, तर ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यामुळे तुमची पाठ आणि मणके प्रभावित होऊ शकतात. फिटनेस तज्ज्ञांनी, ‘दी इंडियन एक्स्प्रेस.कॉम’ला याबाबतची माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. अमोल पाटील, सहायक प्राध्यापक, एमबीए-स्पोर्ट्स मॅनेजमेंट, के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांनी, “डेड लिफ्टिंगसारखा जड व्यायाम करताना सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि इअरफोन घातल्याने तुमच्या सुरक्षिततेशी कशी तडजोड होऊ शकते,” हे सांगितले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
इअरफोनमुळे इतर आवाज आपल्या कानांवर पडत नाहीत. जसे की, जिममधील स्पॉटरच्या सूचना किंवा बारबेल हलविण्याचा किंवा खाली पडण्याचा आवाज. या संभाव्य धोक्यांना जलद आणि सुरक्षितपणे प्रतिक्रिया देण्यासाठी हे आवाज ऐकू येणे खूप गरजेचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
इअरफोन लावून गाणी ऐकत असल्यामुळे आपले अर्धे लक्ष गाण्यावर असते. त्यामुळे कमी जागरूकता पाहायला मिळू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
इअरफोनमुळे तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सूचना वा संकेत ऐकू येत नसतील, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने व्यायाम करू शकता किंवा एखाद्या धोकादायक परिस्थितीवर प्रतिक्रिया देण्यात अयशस्वी होऊ शकता; ज्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कल्ट फिट, मुंबई आणि पुणे येथील स्ट्रेंथ अॅण्ड कंडिशनिंगचे क्लस्टर फॉरमॅट हेड अरुण ब्लम म्हणाले, “डेडलिफ्ट्स हा कम्पाऊंड मूव्हमेंट व्यायाम आहे; ज्यासाठी लक्ष केंद्रित करणे, लक्ष देणे आणि मन व शरीराने एकरूप होणे गरजेचे आहे. डेडलिफ्टिंगदरम्यान इअरफोनमुळे दुखापतीकडे दुर्लक्ष होऊन, ती सहन करणे खूप सोपे होते. त्यामुळे इअरफोन न वापरण्याची शिफारस केली जाते. कारण- त्यामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ शकते.”(फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. पाटील यांनी ताण कमी करण्यासाठी डेडलिफ्टिंगपूर्वी तुमच्या स्नायूंना योग्य रीतीने उबदार करण्याचा सल्ला दिला आणि तुम्हाला दुखापत टाळण्यासाठी व व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी योग्य फॉर्म असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे. (फोटो सौजन्य: Freepik)

“तुम्ही टिपिकल नवरा नाही तर माझे…”, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या पत्नीची वटपौर्णिमेनिमित्त खास पोस्ट, अभिनेता म्हणाला…