-
त्वचेला नैसर्गिकरीत्या सुंदर बनविण्यासाठी मुलतानी मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (फोटो सौजन्य:Freepik)
-
त्वचा स्वच्छ, एक्सफोलिएट व पोषण करण्याच्या क्षमतेसाठी मुलतानी माती खूप लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य:Freepik)
-
परंतु, त्वचाशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून मुलतानी मातीचा वापर सगळ्याच गोष्टींसाठी करणे योग्य नाही.(फोटो सौजन्य:Freepik)
-
अभिवृत एस्थेटिक्सचे सह-संस्थापक, कॉस्मेटोलॉजिस्ट व त्वचा तज्ज्ञ डॉ. जतीन मित्तल म्हणाले, “मुलतानी माती तेलकट आणि मुरमे आलेल्या व्यक्तींसाठी त्याच्या उच्च शोषक गुणधर्मांमुळे वरदान ठरू शकते.” (फोटो सौजन्य:Freepik)
-
हे जास्तीचे तेल प्रभावीपणे भिजवते, छिद्रे बंद करते व अशुद्धता काढून टाकते. त्यामुळे मुरमांपासून बचाव होतो. त्याचा थंड प्रभाव मुरमांशी संबंधित जळजळ आणि चिडचिडदेखील शांत करतो.” (फोटो सौजन्य:Freepik)
-
“परंतु, दीर्घकाळापर्यंत मुलतानी मातीचा वापर केल्याने तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्यामुळे त्वचा कोरडी होते,” असे डॉ. रिंकी कपूर, सल्लागार, त्वचाशास्त्रज्ञ, कॉस्मेटिक त्वचाशास्त्रज्ञ व त्वचा-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स, मुंबई यांनी सांगितले. (फोटो सौजन्य:Freepik)
-
डॉ. मित्तल यांनीदेखील विशेषत: कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. (फोटो सौजन्य:Freepik)
-
डॉ. कपूर यांच्या म्हणण्यानुसार, सर्वांच्या त्वचेसाठी मुलतानी मातीचा उपाय फायदेशीर ठरू शकत नाही. कारण- प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार, पोत, अॅलर्जी आणि वैद्यकीय परिस्थिती वेगवेगळी असते. (फोटो सौजन्य:Freepik)
-
“मुलतानी माती ही त्वचेच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांनुसार परिणाम दाखवू शकते. ती तेलकट, मुरमे असलेल्या त्वचेसाठी आश्चर्यकारक काम करते; परंतु कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेसाठी ती खूप कठोर ठरू शकते. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या त्वचेचा प्रकार विचारात घ्या आणि मगच त्याचा वापर करा,” असे डॉ. मित्तल म्हणाले. (फोटो सौजन्य:Freepik)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा