-
निरोगी आरोग्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखणे अत्यंत आवश्यक आहे. पण, “योग्य पद्धतीने पाणी पिण्यासाठीही काही ठरलेले नियम आहेत.
-
कारण- जसा अन्नाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, तसाच परिणाम पाण्याचाही होतो. त्यामुळे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरावर होणारे परिणाम सुधारण्यासाठी त्याचे नियमन करणे आवश्यक आहे, असे आहारतज्ज्ञ सिमरन वोहरा यांचे मत आहे.”
-
पाणी पिण्याचे नियम पाळल्यास खरंच वजन कमी होईल का?
“विशिष्ट वेळी (आणि विशिष्ट प्रमाणात) पाणी पिण्याने वजन कमी करण्यास कशी मदत होते,” हे त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये उघड केले आहे. -
सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यावे.
व्यायाम करण्याच्या एक तासापूर्वी दोन ग्लास पाणी प्यावे.
व्यायामाच्या ३० मिनिटांनंतर दोन ग्लास पाणी.
जेवणाच्या ३० मिनिटे आधी दोन ग्लास पाणी.
नाश्ता झाल्यावर दोन ग्लास लिंबू पाणी. -
याबाबत इंडियन एक्स्प्रेसने झिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांच्याशी संवाद साधला आणि पाणी पिण्याचे हे नियम पाळल्यास खरेच वजन कमी होऊ शकते का हे जाणून घेतले.
-
कोमट पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी ठरू शकते फायदेशीर
दररोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय पातळी वाढण्यास मदत होते. “कोमट पाणी बद्धकोष्ठता, गॅस, अपचन व अतिसार यांसारख्या पचनाशी संबंधित सर्व समस्यांचे त्वरित निराकरण करते; ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये शोषून घेणे सोपे होते. -
कोमट पाणी रक्ताभिसरण सुधारू शकते आणि संभाव्य वेदना कमी करू शकते. तसेच, कोमट पाणी चयापचय सुधारण्यास मदत करते; जे वजन कमी करण्यासाठी पुरेशा कॅलरीज बर्न करण्यास मदत करते,” असे पटेल यांनी स्पष्ट केले.
-
वजन कमी करण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही
पण, फक्त पाणी पिऊन वजन कमी करणे अशक्य आहे. “दिवसभर हे तुम्हाला हायड्रेट ठेवेल यात शंका नाही; परंतु विविध घटकांमुळे वजन कमी होते,” यावर पटेल यांनी जोर दिला. -
वजन वाढण्याचे मूळ कारण समजून घेतल्याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योग्य योजना तयार करण्यास मदत होऊ शकते.
-
वजन कमी करण्यासाठी काय खाणे टाळावे
पटेल यांच्या मते, प्रक्रिया केलेले अन्न खाणे, पॅक केलेले अन्न आणि जंक फूड, तणाव, तणावपूर्ण जीवनशैली, आनुवंशिकता आणि काही औषधे यासारख्या घटकांमुळे तुमचे वजन कमी होण्यावर परिणाम होऊ शकतो. “कामाच्या अधिक तासांसह व्यग्र जीवनशैलीमुळे वजन वाढते. -
दिवसभरात वारंवार विश्रांती घेत असल्याची खात्री करा. पौष्टिक पदार्थांऐवजी अस्वास्थ्यकर (unhealthy), प्रक्रिया केलेले आणि पॅकेजमधील अन्न निवडल्याने तुमची चयापचय क्रिया मंदावते,” असे पटेल यांनी नमूद केले.
-
वजन कमी करण्यासाठी काय खावे?
जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स व लीन प्रोटीन यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश असलेला चांगला सर्वसमावेशक आहार घेत आहात याची खात्री करा. -
गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या
जर तुम्ही सतत प्रयत्न करून आणि आवश्यक बदल करूनही वजन कमी करू शकत नसाल, तर आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते. -
“तुमचा आहारतज्ज्ञ तुमच्या सद्य परिस्थितीचे परीक्षण करून, वजन वाढण्याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करील. ते कारण लक्षात आल्यानंतर ते जास्तीत जास्त प्रथिनांचे सेवन सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य स्थिती, अॅलर्जी व अन्नपदार्थांचा प्राधान्यक्रम यांसारख्या घटकांचा विचार करून एक योग्य आहार योजना तयार करू शकतात,” असे पटेल यांनी सांगितले.
-
त्याशिवाय प्रभावी परिणामांसाठी तज्ज्ञांनी सुचविलेल्या आहार योजनेचे काटेकोरपणे पालन करणे हे त्या-त्या व्यक्तीचे कर्तव्य ठरते. (सर्व फोटो -फ्रिपीक)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक