-
अनेकदा घराच्या साफसफाईसाठी लोक बाजारातील महागड्या वस्तू खरेदी करतात, आणतात. परंतु, आपल्या सर्वांच्या घरात एक गोष्ट अशी आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात तुमचे घर सहज स्वच्छ करू शकता.(फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्ही तुरटीच्या मदतीने तुमचे घर सहज आणि कमी वेळेत उजळवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
वास्तविक, तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियलसह इतर अनेक गुणधर्म असतात, ज्याच्या मदतीने तुम्ही घर सहज स्वच्छ करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यासाठी तुम्हाला तुरटीची पावडर किंवा तुरटीचा चुरा,अर्धी बादली पाणी आणि कपडा हे साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
टाइल्समधील घाण तुरटीने सहज साफ करता येते. याच्या मदतीने जमिनीवरची घाण किंवा डाग सहज साफ होतील. (फोटो सौजन्य: Freepik)
-
यासाठी आधी बादलीत पाणी, त्यात तुरटीचा तुकडा किंवा पावडर टाकून पाच मिनिटे तसेेच राहू द्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता फरशी स्वच्छ करण्यासाठी कपड्याच्या मदतीने जमिनीवर पाणी पसरवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता थोडा वेळ फरशी सुकू द्या. यामुळे जमिनीवर असलेले बॅक्टेरिया आणि बुरशी सहज निघून जातील.आता जमिनीवर पसरलेले पाणी कोरड्या कपड्याने पुसून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुरटी बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करते, यामुळे हट्टी डाग आणि घाण सहजपणे काढून टाकते. (फोटो सौजन्य: Freepik)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ‘रविवारी’ बँक सुरू ठेवण्याचे आदेश; मोठी घडामोड होणार…