-
आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे शरीरावर वाईट परिणाम होतो. सर्वाधिक परिणाम हा त्वचेवर होताना दिसतो.
-
निस्तेज त्वचा,ऍक्नेसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर लढा देण्यासाठी या पाच टिप्स त्वचेचं आरोग्य जपायला मदत करतील.
-
त्वचेची शुद्धता : दिवसातून किमान दोन-तीन वेळा चेहरा पाण्याने धुणे आवश्यक आहे. यामुळे प्रदूषणामुळे चेहऱ्यावर असलेले धुळीचे अंश धूतले जाऊऩ आपल्याला ताजेतवाने वाटते.
-
सत्वपूर्ण आहार : व्हिटॅमिन, फायबरसारखे अनेक सत्व असलेल्या पदार्थांचा समावेश नियमित आहारात केल्यास त्वचेचा निरोगीपणा कायम राहण्यास मदत होते.
-
हैड्रेशन : शरीराला योग्य पाणीपुरवठा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी भरपूर पाणी पिणे फायद्याचे आहे. पाणी प्यायल्याने त्वचेचा ओलावा कायम राहतो आणि कोरडेपणा कमी होतो.
-
सनस्क्रीन : घराबाहेर पडण्याआधी त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीन लावणे अत्यंत गरजेचे आहे. हे आपल्याला सूर्याच्या किरणांपासून वाचवते आणि त्वचा निरोगी राहते.
-
निरोगी जीवनशैली : त्वचेसह शरीराची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनशैली फक्त त्वचेसाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य ; पेक्सएल्स )
-
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

“ती जाणूनबुजून…”, एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक, बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेत्रीला धरलेलं जबाबदार