-
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
लवकरच डिसेंबर महिना सुरू होणार असून या महिन्यामध्ये भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
डिसेंबरच्या सुरूवातीला म्हणजेच २ डिसेंबर रोजी शुक्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार असून त्यानंतर शुक्र २८ डिसेंबर रोजी मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या कुंभ राशीतील प्रवेशाने शुक्र ग्रहाची शनी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशींच्या व्यक्तींसाठी शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश सकारात्मक फळ देणारा सिद्ध होईल. या काळात मेष राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींनाही शुक्राचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. शुक्र ग्रहासह तुमच्यावर शनीचीही कृपा असेल. त्यामुळे भाग्याची पुरेपुर साथ तुम्हाला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही लाभदायी सिद्ध होईल.आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही शुक्र ग्रहाचा कुंभ राशीतील राशी परिवर्तन शुभ फळ प्रदान करणारे ठरेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या