-
एचएमपीव्हीच्या प्रकरणांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहे. या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे एक मोठे आव्हान आहे. हा विषाणू प्रामुख्याने श्वासोच्छवासाद्वारे पसरतो, त्यामुळे मास्क वापरणे हे संक्रमणाचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. (Photo : Freepik)
-
सर्व मास्क समान संरक्षण देत नाहीत, त्यामुळे कापडाचे मास्क, सर्जिकल मास्क आणि N95 सारख्या मास्कच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न विचारले जातात. खरंच कापडाचे मास्क सुरक्षित पर्याय आहे का? (Photo : Freepik)
-
फरीदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजीचे संचालक डॉ. रवी शेखर झा द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “कापडी मास्क सोयीचे असले तरी HMPV सारख्या श्वसन संक्रमणापासून मर्यादित प्रमाणात संरक्षण देतात. ते विषाणूंचे मोठे कण रोखू शकतात, पण लहान कण या मास्कमधून खूप सहज आत शिरतात.” (Photo : Freepik)
-
सर्जिकल मास्क या तुलनेने अधिक प्रभावी आहे. हे मास्क विषाणूंचे कण रोखण्यासाठी डिझाइन
केलेले आहे. पण, हे मास्क सैल असतात ज्यामुळे फिल्टर न केलेली हवा बाजूने नाकामध्ये प्रवेश करते, त्यामुळे या मास्कची कार्यक्षमता कमी होते. (Photo : Freepik) -
डॉक्टर N95 मास्क वापरण्याची शिफारस करतात, जे चांगल्या प्रकारे संरक्षण प्रदान करतात. ते अत्यंत सूक्ष्म कणांसह कमीत कमी ९५ टक्के हवेतील कण फिल्टर करतात. या मास्कचे डिझाइन आणि हे मास्क खूप घट्ट असल्यामुळे हवा आत शिरत नाही. N95 मास्क हे गर्दीच्या आणि खराब हवेच्या ठिकाणी वापण्याचा सल्ला दिला जातो. (Photo : Freepik)
-
मास्क खरेदी करताना काय पाहावे?
फिल्टर क्षमता : NIOSH प्रमाणित N95 मास्क चांगले असतात.
योग्य फिट : मास्क नाक, तोंड, हनुवटीवर अंतर न ठेवता सुरक्षित लावता यावे.
आरामदायी व श्वासोच्छ्वास घेता यावा : मास्क दीर्घकाळ घालण्यास सोपे असावे.
एकापेक्षा जास्त लेअर : एकापेक्षा जास्त लेअर असलेले मास्क एक लेअर असलेल्या मास्कपेक्षा तुलनेने चांगले असतात. (Photo : Freepik) -
“जास्तीत जास्त संरक्षणासाठी N95 मास्क वापरा. N95 उपलब्ध नसेल तर सर्जिकल मास्क हा एक चांगला पर्याय आहे. जर इतर कोणताही पर्याय नसेल तरच कापडाचे मास्क वापरावे आणि त्यावर सुरक्षिततेसाठी सर्जिकल मास्क लावावा”, असे झा सांगतात. (Photo : Freepik)
-
१. नाकाच्या खाली मास्क घालणे, यामुळे हवेतील कण थेट नाकात शिरतात. २. डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरणे. विशेषत: दीर्घकाळापर्यंत एकच मास्क वापरणे, यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
३. मास्कला वारंवार स्पर्श केल्यास मास्कमध्ये विषाणू प्रवेश करू शकतात.
“हे धोके टाळण्यासाठी, तुमचा मास्क योग्य प्रकारे घातला आहे का, नियमितपणे बदलला आहे का आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली आहे का याची खात्री करा”, असे डॉ. झा सांगतात. (Photo : Freepik) -
“लहान मुलांनी लहान आकाराचे मास्क वापरावे ते त्यांना घट्ट बसतात. सर्जिकल मास्क किंवा KF94 मास्क वापरावे. लहान मुलांना N95 श्वास घेण्यास त्रासदायक ठरू शकतात. वृद्धांसाठी N95 मास्क चांगला पर्याय आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी N95 मास्कमुळे अस्वस्थता जाणवू शकते, त्यावेळी सर्जिकल मास्क वापरावा. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी नेहमी N95 मास्कची निवड करावी.” असे डॉ. झा सांगतात (Photo : Freepik)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या