-
उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम म्हणजे चवदार आणि ताज्या चटण्यांचा सणच!
-
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कैरी हा उत्तम घटक आहे
-
खालील चटकेदार आणि चवदार चटण्यांचा आस्वाद नक्की घ्या :
-
भेळीसाठी आंबट-गोड कैरी चटणी कैरी, गूळ, चिंच व थोडे मसाले घालून बनवलेली ही चटणी भेळ, चाटसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे.
-
गोड आंब्याची चटणी पिकलेल्या आंब्याचा वापर करून साखर, जिरे, मीठ व थोडं आलं बनवलेली ही चटणी चवीला अप्रतिम आणि पचायलाही हलकी असते.
-
कैरी-खोबऱ्याची कोकणी चटणी नारळ, कैरी, लाल मिरची आणि कोकणी मसाले एकत्र करून बनवलेली ही कोकणी चटणी वरणभाताच्या ताटावर अप्रतिम पर्याय ठरेल.
-
कैरी-टोमॅटो चटणी टोमॅटोचा गोडसरपणा आणि कैरीची तिखट-आंबट चव पोळी किंवा भाकरीसोबत अनुभवणे म्हणजे चविष्ट मेजवानी आहे.
-
कैरी-पुदिना चटणी पुदिन्याचा थंडावा आणि कैरीचा आंबटपणा, उन्हाळ्यासाठी परफेक्ट कॉम्बो.
-
कैरी-हिरव्या मिरचीची झणझणीत चटणी कच्ची कैरी, हिरवी मिरची, मीठ आणि तेल घालून झणझणीत चटणीचा जेवणासह आस्वाद घ्या.
-
कैरी-लसूण चटणी लसूणाच्या तिखटपणासोबत कैरीची आंबट चव. ही चटणी पराठ्यांसोबत अतिशय चवदार लागेल.
-
कैरी-कोथिंबीर चटणी कच्ची कैरी आणि कोथिंबीर यांचं मिश्रणाणि त्यात थोडं आलं, मिरची घालून अनुभवा चविष्ट चटणी.
-
ठेचलेल्या कैरीची चटणी कच्ची कैरी थोडीशी ठेचून, त्यात लसूण, मिरची व मीठ घालून केलेली ही चटणी म्हणजे जेवणाची खरी सोबती.
-
या चटण्या तुम्ही पोळी, भाकरी, पराठा, भात किंवा अगदी खिचडीसोबतही सर्व्ह करू शकता.
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स, पिंटरेस्ट)