-
केक आणि ब्रेडपासून ते समोसा, वडापाव, सँण्डवीचपर्यंत अशा आपल्याला आवडणाऱ्या बहुतेक फास्ट फूडमध्ये मैदा वापरला जातो. मैदा आरोग्यासाठी चांगला नाही हे आपण अनेकदा ऐकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“मैदा खूप प्रक्रिया केलेला आणि पोषक तत्वांपासून वंचित आहे. मैदा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण करू शकते,” असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चांगल्या आरोग्यासाठी, मैद्याचे नकारात्मक परिणाम ओळखून घेणे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आणि बहुमुखी पर्यायांचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
गव्हाचे पीठ : भारतीय स्वयंपाकघरांमध्ये सर्वात सहज उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक असलेले गव्हाचे पीठ हे मैद्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. “गव्हाचे पीठ हा मैद्याच्या ऐवजीचा सर्वात जवळचा पर्याय आहे. ते अधिक फायबर, पोषक तत्व देते, शिवाय हे आतड्यांसाठीदेखील चांगले आहे. ते पोळी, पराठे, ब्रेड आणि केक बनवण्यासाठीही चांगला पर्याय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
नाचणीचे पीठ : भारतातील एक पारंपरिक धान्य असलेल्या नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि अमिनो आम्ल भरपूर प्रमाणात असतात. “हे ग्लूटेन-मुक्त आहे, पचायला सोपे आहे आणि भाकरी, लाडू किंवा कुकीज बनवण्यासाठीदेखील योग्य आहे,” असे एडविना राज म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बदामाचे पीठ : एडविना राज म्हणाल्या की, “बदामाचे पीठ ग्लूटेन-मुक्त आहे आणि निरोगी चरबींनी भरलेले आहे, ज्यामुळे ते कमी-कार्ब आणि केटो सर्कलमध्ये आवडीचे बनते. बारीक कुस्करलेल्या बदामांपासून बनवलेले, ते बेक्ड पदार्थांना एक उत्तम चव आणि पौष्टिकता देते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
ओट्स पीठ : “ओट्स पीठ घरी बारीक करून सहज बनवता येते. ते विरघळणाऱ्या फायबरने भरलेले असते, विशेषतः बीटा-ग्लुकन, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करते. ओट्सच्या पिठाची चव थोडी गोड असते आणि ती मफिन, पॅनकेक्स आणि डोसा पिठातही चांगली काम करते. रचनेसाठी ते इतर पिठांबरोबर मिसळा,” असे एडविना राज म्हणाल्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चण्याचे पीठ : चण्याच्या पिठात प्रथिने आणि फायबर भरपूर असतात. “भारतीय स्वयंपाकघरांमध्ये भजी बनवण्यापासून ते लाडू, शेव, चिवडा बनवण्यापर्यंत अशा अनेक पदार्थांमध्ये ते वापरले जाते. बेसन नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहे, ज्यामुळे ते चवदार पाककृतींसाठी एक उत्तम पर्याय बनते”, असे एडविना राज म्हणाल्या.
(फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)

ऑगस्टमध्ये ‘या’ पाच राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ, नवग्रहांचे गोचर देणार प्रत्येक कामात यश