-
ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेवरून आपण लोकांविषयी जाणून घेऊ शकतो. अंकशास्त्रात १ ते ९ मूलांक असतात.या मूलांकच्या आधारावर व्यक्तिमत्त्व, करिअर, व्यवसाय आणि भविष्याविषयी सांगितले जाते. (Photo : Freepik)
-
मूलांक हा जन्मतारखेतील संख्येची बेरीज असते. म्हणजेच जर तुमची जन्म तारीख २३ असेल तर २+३ = ५. पाच हा तुमचा मूलांक असेल. या मूलांकच्या आधारे आपण त्या व्यक्तीविषयी सविस्तर जाणून घेऊ शकतो. (Photo : Freepik)
-
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकमध्ये काही विशेष गोष्टी असतात तर काही कमतरता असतात. आज आपण कोणत्या मूलांकचे लोक वयानुसार श्रीमंत बनतात, हे जाणून घेणार आहोत. कोणत्या मूलांकच्या लोकांना अंकशास्त्रामध्ये नशीबवान आणि श्रीमंत सांगितले आहे, जाणून घ्या. (Photo : Freepik)
-
मूलांक १
अंकशास्त्रानुसार मूलांक १ अत्यंत पावरफूल आकडा मानला जातो. अंक १ हा सूर्य देवाचा अंक आहे. सूर्य देव ग्रहाचा राजा, आत्मविश्वास, आरोग्य, सन्मान, यशाचा दाता मानला जातो. (Photo : Freepik) -
सूर्य ऊर्जा, नेतृत्व क्षमता, शिस्त आणि आव्हानांशी लढण्यास हिम्मत देतो. या गुणाच्या प्रभावाने मूलांक १ लोक अत्यंत हुशार आणि नेतृत्व सांभाळणारे असतात. ते मोठी पद प्रतिष्ठा प्राप्त करतात आणि खूप जास्त श्रीमंत बनतात. (Photo : Freepik)
-
मूलांक ५
अंक ५ चा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह धन, व्यवसाय, बुद्धीचा कारक मानला जातो. मूलांक ५ असलेले लोक संवादात हुशार, बुद्धिमान आणि कामामध्ये परिपूर्ण असतात. (Photo : Freepik) -
मूलांक ५ असलेले लोक मोठे व्यावसायिक बनतात. तसेच धन कमावतात. जमीन धनसंपत्तीचे मालक बनतात. (Photo : Freepik)
-
मूलांक ६
अंकशास्त्रामध्ये मूलांक ६ हा अत्यंत शुभ आकडा मानला जातो. अंक ६ चा स्वामी शुक्र ग्रह असतो. शुक्र ग्रह हा धन संपत्ती, वैभव, ग्लॅमर, प्रेम आणि रोमान्सचा कारक मानला जातो. (Photo : Freepik) -
हेच कारण आहे मूलांक ६ असलेले लोक अतिशय सुंदर आणि आकर्षक तसेच श्रीमंत असतात. लोक यांच्याकडे आकर्षित होतात. या लोकांना लक्झरी आयुष्य जगण्याची आवड असते आणि ते असे आयुष्य सुद्धा जगतात. (Photo : Freepik)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case