-
काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. मात्र, सध्या पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीर जगभरात चर्चेत आहे. काश्मीरमधील सुंदर निसर्ग आणि वातावरण नेहमीच लोकांना आकर्षित करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
देशातीलच नव्हे, तर अगदी परदेशातील लोकही लोक येथे भेट देण्यासाठी येतात. काश्मीरच्या निसर्गाबरोबरच येथील लोकही खूप सुंदर आणि आकर्षक असतात. त्याशिवाय काश्मिरी मुलींच्या नैसर्गिक सौंदर्याचीही अनेकदा उदाहरणे दिले जातात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यांचे सौंदर्य काश्मीरमधील हवामानासह त्यांच्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित आहे. जर तुम्हालाही काश्मिरी मुलींप्रमाणे नैसर्गिक सौंदर्य हवे असेल, तर तुम्ही खालील टिप्स नक्कीच फॉलो करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
१९६१ मध्ये JAMA मध्ये प्रकाशित झालेल्या काश्मीरवरील एका लेखात तेथील लोकांच्या जीवनशैलीचे वर्णन करण्यात आले होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
लेखानुसार, तिथे राहणारे लोक शून्यापेक्षा कमी तापमानातही बर्फाच्या थंड पाण्यात आंघोळ करतात. त्यामुळे त्यांची त्वचा घट्ट आणि तरुण राहते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
काश्मीरमध्ये केशर जास्त प्रमाणात पिकवले जाते. काश्मीरच्या महिला सौंदर्य उत्पादन म्हणून केशर वापरतात. चंदन पावडर आणि दुधात केशर मिसळून चेहन्यावर लावल्याने चेहऱ्यावर चमक दिसून येते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
काश्मीरमध्ये अक्रोडाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. त्यात ओमेगा-९, ओमेगा-६, ओमेगा-३ इत्यादी आढळतात, ज्यामुळे आरोग्यासह त्वचा सुंदर होते. अक्रोड खाण्याव्यतिरिक्त महिला त्यांच्या केसांना अक्रोडाचे तेलदेखील लावतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
या लेखात असेही नमूद करण्यात आले होते की, काश्मीरमधील लोक कमी खातात आणि जास्त चालतात. ही जीवनशैली त्यांना सुंदर आणि निरोगी बनवते. अशी जीवनशैली हे दीर्घायुष्य आणि सौंदर्याचे रहस्य आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
काश्मिरी महिलांच्या सौंदर्याचे रहस्य दूध आणि बदामात दडलेले आहे. तिथल्या महिला रात्री बदाम पाण्यात भिजवून ठेवतात आणि सकाळी ते बारीक करून, दुधात मिसळून पेस्ट तयार करतात. मग त्या स्क्रबचा वापर चेहऱ्यावर करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश