-
उन्हाळ्यात अनेक जण पुदिन्याची चटणी खूप आवडीने खातात. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे तो अनेक प्रकारच्या पेयांमध्येदेखील वापरला जातो. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात आणि शरीर डिटॉक्सदेखील होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
वजन कमी करण्यासाठी आणि सकाळी पोट साफ करण्यासाठी ही पाने खूप उपयुक्त आहेत. उन्हाळ्यात पुदिना खाण्याचे चमत्कारी फायदे जाणून घेऊ (फोटो सौजन्य: Freepik) -
पदिन्याच्या पानांमध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्ससारखी शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जी हानिकारक रॅडिकल्सना निष्प्रभ करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पुदिन्याची पाने अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात, पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. त्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोकादेखील कमी होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पुदिन्यामधील मेंथॉल व कार्व्होन या घटकांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते शरीराला हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पुदिन्यामध्ये असलेले पोषक घटक शरीराला धोकादायक बुरशी आणि यीस्टपासून संरक्षण देण्यासह बळकटी देतात. त्याशिवाय तो बुरशीनाशक प्रभावासाठीही काम करतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पुदिन्यामध्ये मेंथॉल, रोझमॊरेनिक अॅसिड व लिन यांसारखी जैविकदृष्ट्या सक्रिय संयुगे असतात, जी विषाणूंची क्रिया कमी करू शकतात. त्यामुळे संसर्ग रोखण्यासदेखील मदत मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पोट साफ करण्यासाठी पुदिन्याचा डिटॉक्स चहा पिऊ शकता. हा चहा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हा चहा शरीराला आतून डिटॉक्स करतो आणि अनेक समस्यांपासून वाचवतो. जर तुम्ही सकाळी लवकर उठल्या उठल्या पुदिन्याचा डिटॉक्स चहा प्यायलात, तर पोट सहजपणे साफ होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..