-
वाढत्या वयानुसार गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या मानली जाते, पण ती टाळता येऊ शकते. बर्याच लोकांना वाटतं की हा केवळ वृद्धत्वाचा परिणाम आहे. पण, खरंतर काही साध्या सवयी आणि नियमित व्यायामाच्या मदतीने आपण या वेदनांवर नियंत्रण मिळवू शकतो.
खाली आपण दोन प्रभावी व्यायाम पाहणार आहोत, जे केवळ गुडघ्यांचे नव्हे तर कंबरेचेही बळकटीकरण करतात. हे व्यायाम गुडघ्यांमध्ये रक्ताभिसरण वाढवतात, स्नायूंना लवचिक ठेवतात आणि वेदना कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. -
गुडघेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते, फक्त वय वाढल्यामुळे नाही. खेळताना झालेली दुखापत, ऑस्टियोपोरोसिस, वजन वाढणे, हाडांमध्ये घर्षण, जास्त चालणे किंवा उभं राहणं, संधिवात, सूज, लालसरपणा आणि हालचालीतील अडचण हे सर्व त्रासदायक कारणं ठरू शकतात.
-
बऱ्याच लोकांना वाटतं की दुखत असताना फक्त आराम करावा, पण ते पूर्णपणे खरं नाही. सौम्य व्यायाम रक्ताभिसरण वाढवतो, सांधे लवचिक ठेवतो आणि स्नायूंना बळकटी देतो; यामुळे गुडघ्यांवरील दाब कमी होतो आणि वेदनाही हळूहळू कमी होतात.
आराम करा, पण योग्य व्यायामही करा. तेच तुमच्या गुडघ्यांचं खरं बळ. -
गुडघेदुखी कमी करण्यासाठी अतिशय सोपा पण प्रभावी व्यायाम : सरळ उभे राहा, हात कंबरेवर ठेवा. आता एक पाय हळूच वर उचला, सरळ ठेवा आणि पाच सेकंद तसाच धरून ठेवा. नंतर दुसऱ्या पायानेही हेच करा. अशा प्रकारे प्रत्येक पायावर १०-१५ वेळा करा.
या व्यायामामुळे मांडीचे स्नायू सक्रिय होतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि गुडघ्यावरचा ताण कमी होतो. -
सरळ उभे राहा, एक पाय स्थिर ठेवा आणि दुसरा पाय हळूहळू पुढे-मागे हलवा. संतुलनासाठी हात कंबरेवर किंवा भिंतीच्या आधारावर ठेवा. दोन्ही पायांनी हीच हालचाल १०-१५ वेळा करा.
या साध्या हालचालीमुळे कंबरेचे फ्लेक्सर स्नायू सक्रिय होतात, कंबरेला बळकटी मिळते आणि गुडघ्यातील रक्तप्रवाह वाढून वेदना कमी होतात. -
गुडघ्यांची काळजी घ्या – आजपासूनच!
व्यायाम करताना जर वेदना वाढत असतील तर लगेच थांबा. सुरुवात नेहमी सौम्य आणि सोप्या व्यायामांनीच करा. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण आरोग्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही.
वय काहीही असो, गुडघे निरोगी ठेवण्यासाठी आजच थोडा वेळ काढा. दररोज काही मिनिटांचा सौम्य व्यायाम तुमची पाठ मजबूत करेल, रक्ताभिसरण वाढवेल आणि गुडघेदुखी दूर ठेवेल.

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…