-
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणून पालेभाज्या खा असे मुलांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते.भाजी खरेदीसाठी जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तेव्हा असंख्य प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला बाजारात दिसतात. तर आज आपण त्यातील एक म्हणजे लालमाठची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. लालमाठाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लालमाठाची भाजी बनवण्यासाठी एक लालमाठाची जुडी, लसूण – दोन पाकळ्या, मिरची – चार मिरची (आवडीनुसार) किंवा लाल तिखट, कांदा – एक किंवा दोन, बारीक किसलेलं सुखं किंवा ओलं खोबर, मीठ इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मार्केटमधून एक लालमाठाची जुडी आणा. सगळ्यात पहिला जुडी निवडून घ्या. त्यानंतर स्वछ पाण्याने धुवून घ्या आणि मग बारीक चिरून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर दोन कांदे कापून घ्या, लसणीच्या दोन पाकळ्या सोलून घ्या. कढईत तेल घ्या. त्यात जिरं घाला आणि मग कांदा आणि लसूण घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लालसर झाल्यानंतर सुखं किंवा ओलं खोबर त्यात घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर मीठ, मसाला किंवा मिरची आणि चिरून घेतलेली भाजी त्यात घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दहा मिनिटे झाकण टाकून ठेवा. टीप : पाणी अजिबात घालू नका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अशाप्रकारे तुमची लालमाठाची भाजी तयार. सकाळी उठल्यानंतर भाजी करण्यासाठी घाई होत असेल तर रात्री भाजी निवडून ठेवा आणि भाजी धुवून फ्रिजमध्ये ठेवा. आणि सकाळी बनवा… (फोटो सौजन्य: @Freepik)
Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”