-
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे अंतर्गत औषधतज्ज्ञ डॉ. अमित सराफ सांगतात, मिष्टान्न केव्हा खावं हे प्रत्येकाच्या आरोग्याच्या गरजांवर आणि शरीर साखर कशी पचवतो यावर अवलंबून असतं.
-
जेवणानंतर मिष्टान्न का चांगलं?
डॉ. सराफ यांच्या मते, संतुलित जेवणानंतर गोड खाल्ल्यास रक्तातील साखरेवरचा परिणाम कमी होतो. कारण फायबर, प्रथिने व निरोगी चरबी साखरेचे शोषण कमी करतात. -
मधुमेहींनी घ्यावी विशेष काळजी
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी गोड खाणं टाळायचं नाही, पण ते नेहमी जेवणानंतरच खावं; त्यामुळे साखर झपाट्याने वाढत नाही. (छायाचित्र: फ्रीपिक) -
जेवणापूर्वी गोड खाल्ल्यास काय होते?
रिकाम्या पोटी गोड खाल्ल्यास साखर लगेच वाढते. यामुळे ऊर्जा अचानक वाढते, पण लगेचच थकवा जाणवू शकतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक) -
भूक नियंत्रण बिघडू शकते
जेवणाआधी मिष्टान्न खाल्ल्यास भूक वाढू शकते आणि अन्नावर नियंत्रण राहात नाही, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. (छायाचित्र: फ्रीपिक) -
गोड खाणं टाळायचं नाही, पण प्रमाणातच
गोड खाण्यात चुकीचं काही नाही, पण संयम ठेवणं आणि योग्य वेळेची निवड करणं महत्त्वाचं आहे, असं डॉ. सराफ सांगतात. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक) -
चुकलं तरी घाबरू नका!
कधी गोड आधी खाल्लं तर त्याचे परिणाम संतुलित करता येतात. उर्वरित जेवणात प्रथिने, फायबर आणि चरबी असणं आवश्यक आहे. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)

Avimukteshwaranand : “ठाकरे महाराष्ट्रातले नाहीत, मगध येथून आले, आता मराठी..”; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य