-
अनेकांना जेवण झाल्यावर किंवा जेवणाच्या आधीच गोड खाण्याची सवय असते, पण या गोड खाण्याचे आपल्या शरिरावर लगेचच परिणाम दिसू लागतात, महत्त्वाची बाब म्हणजे याबद्दल खूप कमी लोकांनी माहिती असते.
-
ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिनचे संचालक डॉ. अमित सराफ म्हणाले की, याचे कोणतेही एकच ठराविक उत्तर नाही कारण ते तुमचे हेल्थ गोल काय आहे आणि तुमचे शरीर साखर कशी हाताळते यावर अवलंबून असते. (Photo: Getty Images/Thinkstock)
-
डॉ. सराफ यांच्या मते, संतुलित जेवणानंतर मिष्टान्न (dessert) म्हणजेच मुख्य जेवणानंतर एखादा गोड पदार्थ खाणे सामान्यतः चांगले असते. जेव्हा तुम्ही फायबर, प्रथिने आणि हेल्दी फॅट असलेले जेवण घेता तेव्हा ते मिष्टान्नातील साखरेच्या शोषणाचा वेग कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची रिस्पॉन्स अधिक स्थिर होतो. मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा वजन वाढणार नाही याची काळजी घेत असलेल्या लोकांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे, असे डॉ. सराफ म्हणाले. (Photo: Freepik)
-
जेवणापूर्वी गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते, ज्यामुळे नंतर ऊर्जा कमी होऊ शकते आणि तुमची खाण्याची इच्छा वाढू शकते. (Photo: Getty Images/Thinkstock)
-
“जेवण्यापूर्वी मिष्टान्न (dessert) खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढू शकते, विशेषतः जर तुमचे पोट रिकामे असेल तर. यामुळे उर्जा अचानक वाढू शकते आणि त्यानंतर लगेच ती कमी होऊ शकते , ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि तुम्हाला आणखी जास्त गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. कालांतराने, यामुळे भूक नियंत्रण करण्यातही अडचण येऊ शकते आणि ज्यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खायला लागू शकता,” असे डॉ. सराफ म्हणाले. (Photo: Freepik)
-
पण जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही अधूनमधून गोड खाऊ शकता, फक्त ते जेवणाबरोबरच खाण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे प्रमाणही नियंत्रणात ठेवा. (Photo: Getty Images/Thinkstock)
-
अतिरेक टाळणे आणि निर्धारित वेळ यामुळेच सर्व फरक पडतो, असेही डॉ. सराफ यांनी यावेळी नमूद केले. (Photo: Getty Images/Thinkstock)
-
जर तुम्ही जेवणापूर्वीच गोड खाल्ले असेल तर काय होईल? “हा काही जगाचा अंत ठरत नाही. फक्त त्याचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी तुमच्या उर्वरित जेवणात फायबर, प्रथिने आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करण्याकडे लक्ष द्या. सक्रिय राहणे, पाणी पिणे आणि मात्रा नियंत्रणात ठेवणे यामुळे कोणताही नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. सराफ म्हणाले. (Photo: Getty Images/Thinkstock)
-
एकंदरीत कोणत्याही वेळी पोटभर गोड खाण्यापूर्वी सर्वांनी याचा त्यांच्या शरिरावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे.

Jayant Patil: “ज्यांनी राजीनामा दिला, त्यांना…”, जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया