-
पावसाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्याल?
पावसाळा आल्हाददायक असतो; पण या ऋतूमध्ये हृदयाच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यायला हवी. दमट हवामानामुळे जंतू आणि विषाणूंचा धोका वाढतो. त्याशिवाय पचनशक्तीही कमी होते. म्हणून योग्य आहार घेणे गरजेचे आहे.. -
काय टाळावे आणि काय निवडावे?
पावसाळ्यात जास्त पाण्याचे प्रमाण असलेले फळे-भाज्या जसे टोमॅटो, काकडी, टरबूज टाळावीत. त्याऐवजी ओट्स, ब्राऊन राईस, मक्याचे पदार्थ व चणे यांसारखे कोरडे व पचायला हलके पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. -
हंगामी फळांचा समावेश करा
पावसात मिळणारी नाशपती, ड्रॅगन फ्रूट व क्रॅनबेरी यांसारखी फळं आरोग्यासाठी खूप चांगली असतात. नाशपतीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. हृदयरोग्यांसाठी ही उत्तम फळे आहेत. -
फायबरयुक्त अन्नाचे फायदे
केळी आणि पपईसारखी फळे पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. ज्वारी, नाचणी, बाजरी आणि गव्हाचे पीठ हे संपूर्ण धान्य फायबरचे चांगले स्रोत आहेत हे नियमित आहारात असायलाच हवेत. -
दुधापेक्षा दही चांगले!
पावसाळ्यात दूध आणि मिल्क शेकसारख्या पदार्थांपासून दूर राहा. ते दमट हवामानात पटकन खराब होतात आणि आजाराला कारणीभूत ठरू शकतात. त्याऐवजी थोड्या प्रमाणात दही खाणे चालू शकते. -
हृदयासाठी सुपरफूड्स
लसूण, आवळा, मेथी, मोरिंगा, कोकम व गोड कडुलिंब हे आपल्या आहारात जरूर असावे. हे अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि पोषक तत्त्वांनी भरलेले असून हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात. -
हृदयासाठी खास टीप
प्रोटीन योग्य प्रमाणात घ्या. आले हे पचनासाठी उत्तम असून, ते गॅस, कफ कमी करते आणि पोट हलके ठेवते. हृदयासाठीदेखील ते खूप फायदेशीर आहे.

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”