-
सकाळी चेहरा स्वच्छ करा रोज सकाळी उठल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने आणि सौम्य फेसवॉशने स्वच्छ धुवा. रात्री त्वचेमध्ये साचलेली घाण, तेल, मृत पेशी यामुळे चेहरा थकल्यासारखा दिसतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात ताजेपणाने करणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
टोनर वापरण्याची सवय लावा फेसवॉशनंतर त्वचेमधील पीएच बॅलेन्स बिघडू शकतो. यासाठी नैसर्गिक घटक असलेला टोनर वापरल्यास त्वचेचा पोत सुधारतो, छिद्र आखूड होतात आणि त्वचा मृदू भासते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
पोषणदायक सिरम वापरा सिरममध्ये असणारे घटक त्वचेमध्ये खोलवर मुरतात. व्हिटॅमिन C, हायलूरॉनिक अॅसिड किंवा अँटी-ऑक्सिडंटयुक्त सिरम त्वचेला पोषण देतात आणि उजळपणा आणतात. (फोटो सौजन्य : Pexels)
-
ओलावा राखणारा क्रिम लावा त्वचा कोरडी किंवा तेलकट असली तरीही मॉइश्चरायझर गरजेचा आहे. योग्य प्रकारचा मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट करतो, मऊ ठेवतो आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सनस्क्रीन नियमित वापरा उन्हात बाहेर जाणं असो वा नसो, त्वचेला हानीकारक UV किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन आवश्यक आहे. SPF ३० किंवा त्याहून जास्त असलेला सनस्क्रीन रोज लावा. (फोटो सौजन्य : Pexels)
-
रात्री मेकअप नीट काढा रात्रभर मेकअप ठेवणे त्वचेसाठी धोकादायक असते, त्यामुळे झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करून सर्व मेकअप काढा. यामुळे त्वचेला श्वास घेता येतो आणि ती पुनरुज्जीवित होते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
आठवड्यातून दोनदा स्क्रब करा मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग आवश्यक आहे. सौम्य स्क्रबचा वापर करून आठवड्यातून एक किंवा दोन वेळा त्वचेला सौम्यपणे स्क्रब करा. (फोटो सौजन्य : Pexels)
-
त्वचेनुसार फेस मास्क वापरा कोरडी त्वचा असल्यास हायड्रेटिंग मास्क आणि तेलकट त्वचेसाठी क्ले बेस्ड मास्क वापरा. फेस मास्कमुळे त्वचेचं पोषण वाढतं आणि थकलेली त्वचा फ्रेश वाटते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
झोप पूर्ण घ्या चांगली झोप हे सौंदर्याचं गुपित आहे. दररोज किमान ७-८ तासांची झोप घेतल्याने त्वचा ताजी, नितळ आणि निरोगी राहते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
आहार आणि पाणी याकडे दुर्लक्ष नका करू बाह्य देखभाल जितकी महत्त्वाची, तितकंच आतून पोषण देणं गरजेचं आहे. दिवसभरात पुरेसे पाणी प्या आणि आहारात फळं, भाज्या, सुकामेवा, प्रोटीन यांचा समावेश करा. (फोटो सौजन्य : Pexels)

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर; म्हणाले, “IT च्या नोटिशीनंतर…”