-
सौंदर्य, सौम्यता व शांत स्वभाव यांमुळे पर्शियन मांजरे जगभरात प्रसिद्ध आहेत. पण, त्यांची देखभाल करणे काही सोपे काम नाही. केवळ त्यांचा आकर्षक चेहरा पाहून एखाद्याने ही जबाबदारी स्वीकारू नये. पर्शियन मांजर पाळण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर भविष्यातील त्रास टाळता येतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
केसांची देखभाल म्हणजे रोजची जबाबदारी पर्शियन मांजरे म्हणजे लांब, रेशमी व गोंडस केसांचे माहेरघर. पण, हेच केस त्यांची सर्वांत मोठी जबाबदारी ठरते. रोज कंगवा न केल्यास त्यांचे केस गाठींमध्ये गुंततात, जे त्यांच्यासाठी वेदनादायक ठरू शकते. त्यामुळे ही प्रक्रिया रोज वेळ देऊन करावी लागते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
चेहरा सपाट; पण काळजीसुद्धा तितकीच या जातीच्या मांजरांचा चेहरा सपाट असतो, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती चिकटपणा येतो. डोळे आणि नाकाची स्वच्छता दररोज करावी लागते. ही एक सवयच बनवावी लागते; अन्यथा संसर्गाचा धोका असतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
‘ग्रूमिंग’शिवाय त्यांच्या सौंदर्याला काही अर्थ नाही पर्शियन मांजरे केवळ ब्रशिंग पुरेसे मानत नाहीत. विशेष ग्रूमिंगसाठी वेळोवेळी अंघोळ, कान-नखे स्वच्छ करणे गरजेचे असते. काही वेळा ‘लायन कट’सारख्या हेअरस्टाईल्सही घेतल्या जातात; पण तरी त्यांना सैल ठेवणे परवडत नाही. (फोटो सौजन्य : FreePik)
-
स्वभावाने शांत; पण स्वच्छतेसाठी जागरूक या मांजरी थोड्या आळशी; पण अत्यंत प्रेमळ असतात. त्या फारशा चळवळ्या नसतात; पण आपल्याला ओळखू लागल्यावर त्या घरातल्या सदस्यांसारख्या वागत राहतात. त्यांच्याभोवती स्वच्छता राखणं म्हणजेच त्यांच्या आरोग्याची पहिली पायरी. (फोटो सौजन्य : FreePik)
-
बंद घरातच त्यांचे खरे स्थान पर्शियन मांजरे उष्णता, धूळ किंवा खुली हवा सहन करू शकत नाहीत. त्यांना वातानुकूलित किंवा शांत, स्वच्छ घरामध्ये ठेवावे लागते. रस्त्यावर किंवा अंगणात मोकळे फिरणे त्यांच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते. (फोटो सौजन्य : FreePik)
-
आरोग्याच्या बाबतीत सजगतेची गरज या जातींमध्ये मूत्रपिंडाचे विकार (PKD) आणि डोळ्यांचे त्रास अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे वेळोवेळी पशुवैद्यकांकडे आरोग्य तपासणी करणे गरजेचे ठरते. त्यामुळे विश्वासार्ह आणि सर्टिफिकेट असलेल्या विक्रेत्याकडूनच मांजर घ्यावे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
खर्च आणि जबाबदारी दोन्हींची तयारी हवी पर्शियन मांजराची किंमत ही त्यांचा दर्जा, आरोग्य व जात यांवर अवलंबून असते. भारतात त्यांच्या किमती एक ते चार लाखांपर्यंत जातात. त्यांच्यावर होणारा खर्च केवळ एकदाच नाही, तर आजार, फूड, ग्रूमिंग व तपासणी यांवरही वारंवार होतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
भावनिक बंध आणि ‘लॅप कॅट’चा अनुभव हे मांजरे लवकर जुळवून घेतात. एकदा विश्वास बसल्यावर ती मांजर तुम्हाला प्रत्येक वेळेस दरवाजापाशी भेटेल; मांजरासारखं वागेल नाही – तर आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य वाटेल. मात्र त्यांच्याशी नाते बांधण्यासाठी संयम, प्रेम आणि रोज वेळ देणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : FreePik)
-
पर्शियन मांजर म्हणजे केवळ शोभेची वस्तू नाही. ती एक जबाबदारी आहे. जर तुम्हाला वेळ, जागा, पैसा व प्रेम देण्याची तयारी असेल, तरच हे गोंडस प्राणी तुमचं आयुष्य समृद्ध करतील. (फोटो सौजन्य : FreePik)
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार