-
पावसाळ्यात आपली पचनक्रिया थोडी मंदावते, यामुळे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पावसाळ्यात काही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः दही खाण्याबाबत सतर्कता आवश्यक आहे.
-
पावसाळ्यात दही खाण्यापूर्वी ही माहिती आवश्यक
दही हे पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त मानले जाते. यामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. पण, पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे दही खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. -
सर्दी-खोकल्यावर दही खाल्लं तर होऊ शकतो त्रास
जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल तर अशावेळी दही टाळावं, यामुळे प्रकृती अधिक बिघडू शकते. तसेच दही खाल्ल्याने शरीरात लाळ वाढू शकते आणि थंडी वाढू शकते. -
आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात थंड अन्न खाल्ल्याने पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारखे त्रास होऊ शकतात. दही खायचंच असेल तर त्यात काळी मिरी किंवा भाजलेलं जिरं घालून खावं, जेणेकरून पचन सुलभ होईल. -
रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका
पावसाळ्यात दही खाल्ल्याने काहींच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. लाळ गळण्यासारखी समस्या वाढते, ज्यामुळे पोट खराब होण्याचा धोका असतो. तसेच हंगामी आजार आणि ॲलर्जी याही अधिक प्रमाणात होतात. -
दही खाण्याची सवय असेल तर…
दही खाणं आवडत असेल, तर पावसाळ्यात घरी बनवलेलं आणि ताजं दहीच खावं. बाजारात मिळणारं किंवा आंबट झालेलं दही टाळावं. आंबट दही खाल्ल्याने पोटात जळजळ, अतिसार आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

सरन्यायाधीश गवईंच्या तब्येतीबाबत मोठी बातमी, तातडीने रुग्णालयात दाखल….