-
दैनंदिन धावपळीत शरीर आणि मनावर ताण वाढत जातो.
कामाचा भार, अनियमित दिनचर्या व विश्रांतीचा अभाव यांमुळे चिडचिड, थकवा, झोपेचा अभाव व पचनाच्या समस्या निर्माण होतात. आपल्यातील बरेच जण स्वतःकडे लक्ष देणं विसरतात, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. -
दररोज थोडा वेळ योगासाठी दिल्यास हे त्रास टाळता येतात.
योगासने शरीराला लवचिक आणि मजबूत तर बनवतातच; पण त्यासोबतच मानसिक शांतता व संतुलन राखले जाते. अनेक योगासनांपैकी ‘सेतुबंधासन’ हे एक महत्त्वाचं आसन आहे. त्याला ‘ब्रिज पोज’ असंही म्हणतात. दिवसभर संगणकावर बसून काम करणाऱ्यांसाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरतं. -
सेतुबंधासनमुळे पाठदुखी कमी होते आणि मन शांत राहतं.
हे आसन पाठीचा कणा, पाठ व मान मजबूत करतं. त्यामुळे एकाच जागी बराच वेळ बसण्यानं होणाऱ्या वेदना कमी होतात. तसेच, हे आसन मनावरील ताण कमी करतं. वारंवार थकवा, चिंता किंवा झोपेचा त्रास जाणवत असल्यास हे आसन फायदेशीर ठरू शकतं. हार्मोन्सचं संतुलन राखून चांगला मूड आणि गाढ झोप यांसही ते मदत करतं. -
सेतुबंधासनाचे आश्चर्यकारक फायदे :
सेतुबंधासन, ज्याला ब्रिज पोज, असेही म्हणतात. हे आसन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या आसनामुळे शरीरातील स्नायूंना विश्रांती मिळते आणि थकवा कमी होतो. त्याशिवाय, पोट, फुप्फुसे आणि थायरॉईड ग्रंथीवरही सकारात्मक परिणाम होतो. हे आसन पचनक्रिया सुधारते आणि श्वासोच्छ्वासाच्या त्रासांपासून आराम मिळवतो. नियमितपणे केल्यास हार्मोनच्या असंतुलनाशी संबंधित तक्रारीही कमी होतात. -
महिलांसाठी सेतुबंधासनाचे विशेष फायदे :
महिलांना मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या त्रासांपासून, जसे की पोटदुखी, थकवा व मूड स्विंग होणे यांपासून दिलासा देणारे हे आसन आहे. रजोनिवृत्तीच्या काळात मानसिक शांतता आणि शारीरिक विश्रांती मिळविण्यासाठीही ते उपयोगी आहे. हे आसन नियमित केल्याने पाय, घोटे व कंबरेचे स्नायू बळकट होतात, ज्यामुळे चालणे सुलभ होते आणि शरीरात उत्साह टिकून राहतो. -
सेतुबंधासन करण्याची योग्य पद्धत :
हे आसन करण्यासाठी प्रथम चटईवर पाठीवर सरळ झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवून तळवे जमिनीवर दाबा. नंतर गुडघे वाकवून पाय कंबरेजवळ आणा. दीर्घ श्वास घेताना हळूहळू कंबर वर उचला, जेणेकरून शरीराचा आकार पुलासारखा दिसेल. श्वास सामान्य ठेवून काही सेकंदे तेथेच थांबा. नंतर श्वास सोडत हळूहळू पूर्वस्थितीत या. दररोज काही मिनिटे हे आसन केल्याने शरीर आणि मन शांत राहून, ताजेतवाने झाल्याचा अनुभव मिळतो.

Chaddi Baniyan Gang: विधिमंडळातच आमदारांनी घातली बनियन, कमरेला गुंडाळला टॉवेल; ‘चड्डी बनियान गँग’च्या दिल्या घोषणा