-
फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली फळे कोणत्याही संतुलित आहाराचा एक महत्त्वाचा घटक असतात. ती अनेक आरोग्यदायी फायदे देतात, ज्यात विशिष्ट प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण, रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे आणि शरीर चांगल्या स्थितीत राखण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु तुम्हाला ठाऊक आहे का? फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असले तरी काही फळांच्या सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी आतड्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम फळे कोणती आणि कोणती टाळावीत हे सांगितले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
असे असले तरी अननस नैसर्गिकरीत्या आम्लयुक्त असते. म्हणून ज्या व्यक्तींना आम्ल रिफ्लक्सचा त्रास किंवा पोटात जळजळ होण्याची शक्यता असते, त्यांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे किंवा तशी लक्षणे वाढताना ते टाळावे. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)
-
लाल केळी किंवा लहान पिवळी इलायची केळी हा उत्तम पर्याय असू शकतो. या केळ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या आम्ल कमी असते आणि पेक्टिन जास्त असते. ते एक विरघळणारे फायबर असते, जे जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये पोटॅशियमदेखील असते, जे पोटातील पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, पूर्णपणे पिकलेल्या केळ्यांचे सेवन करावे. कच्च्या केळ्यांमध्ये प्रतिरोधक स्टार्च असतो, जो काही लोकांमध्ये पोटफुगी वाढवू शकतो किंवा पचनास विलंब करू शकतो. “केळी सामान्यतः सुरक्षित असली तरी रिफ्लक्सचा त्रास असलेल्यांनी त्यांचे शरीर कसे प्रतिसाद देते हे पाहावे,” (फोटो सौजन्य: Freepik)
-
अननसात ब्रोमेलिन असते, जे एक नैसर्गिक एंझाइम आहे. ते प्रथिनांचे पचन करण्यास मदत करते आणि पोट फुगणे व गॅस कमी करण्यास मदत करते. या एंझाइममध्ये सौम्य दाहकविरोधी प्रभावदेखील दिसून येतो, ज्यामुळे आतड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
असे असले तरी अननस नैसर्गिकरीत्या आम्लयुक्त असते. म्हणून ज्या व्यक्तींना आम्ल रिफ्लक्सचा त्रास किंवा पोटात जळजळ होण्याची शक्यता असते, त्यांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे किंवा तशी लक्षणे वाढताना ते टाळावे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“सर्वसाधारणपणे खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये पेरू हे सर्वांत जास्त प्रथिने असलेले फळ म्हणून वेगळे आहे, जे प्रति १०० ग्रॅम अंदाजे २.६ ते ३ ग्रॅम प्रथिने प्रदान करते. त्यात आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील भरपूर असतात, जे सर्व पचन आरोग्य, रोगप्रतिकारक कार्य आणि एकूणच कल्याणाला समर्थन देते” (फोटो सौजन्य: Freepik)

Chaddi Baniyan Gang: विधिमंडळातच आमदारांनी घातली बनियन, कमरेला गुंडाळला टॉवेल; ‘चड्डी बनियान गँग’च्या दिल्या घोषणा