-
वजन कमी करण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्नाच्या सेवनावर मर्यादा घालणे आवश्यक आहे. आपण सहज खातो अशा अनेक पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, अनहेल्दी फॅट्स आणि रिकाम्या कॅलरीज (empty calories) असतात ज्यामुळे तुमची प्रगती खुंटते आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढू शकतो, असे दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनचे प्रमुख सल्लागार डॉ. नरंदर सिंगला यांनी सांगितले. आज आपण अशा ८ प्रक्रिया केलेल्या पदार्थांबद्दल जाणून घेणार आहेत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. (Photo: Freepik)
-
सोडा, पॅकेज्ड ज्यूस आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स सारख्या शुगर ड्रिंक्समध्ये जास्त कॅलरीज असतात आणि त्यात अगदी कमी किंवा कोणतेही पोषण नसते. त्याऐवजी इनफ्युज्ड वॉटर किंवा हर्बल टी निवडा, असे डॉ. सिंगला म्हणाले. (Photo: Freepik)
-
कुकीज आणि पेस्ट्रीसारख्या बेक केलेल्या मिठाईंमध्ये साखर आणि अनहेल्दी फॅट्स भरपूर असतात; त्याऐवजी फळे, ग्रीक योगर्ट किंवा डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खा. (Photo: Freepik)
-
प्रक्रिया केलेले मांस (जसे की बेकन, सॉसेज आणि डेली मीट) मध्ये मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. म्हणून त्याऐवजी ग्रील्ड चिकन किंवा शेंगदाणे यांसारखे लीन म्हणजेच फॅट आणि कॅलरीज कमी असलेले प्रोटीन निवडा. (Photo: Freepik)
-
चिप्स आणि क्रॅकर्स सारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड स्नॅक्सऐवजी काजू, बदाम तसेच फळे किंवा हुमस आणि व्हेजी स्टिक्स हे पर्याय निवडू शकता. (Photo: Freepik)
-
व्हाईट ब्रेड आणि पांढरा भात यांसारख्या रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन मर्यादित करा, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. संपूर्ण धान्ये हे तुमच्या शरीराला जास्त फायबर पुरवतात. (Photo: Freepik)
-
आईस्क्रीम, गोड केलेले दही आणि साखर लावलेला सुका मेवा या ऐवजी तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. (Photo: Pixabay)
-
तळलेले पदार्थ आणि फास्ट फूड टाळा, ज्यामध्ये कॅलरीज जास्त असतात आणि पोषक तत्व कमी असतात. त्याऐवजी घरी बेक, ग्रिल किंवा एअर-फ्राय केलेले जेवण खा.(Photo: Freepik)
-
डॉ. सिंगला यांनी नमूद केले की अल्कोहोल मर्यादित ठेवा, कारण यामुळे रिकाम्या कॅलरीज (empty calories) वाढतात आणि वजन कमी होण्यास अडथळा येऊ शकतो. (Photo: Freepik)
-
हे छोटे बदल केल्याने वजन कमी होण्यास आणि एकूण चयापचय आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. (Photo: Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल