-
दुहेरी ऋतूचा परिणाम आरोग्यावर!
पावसाळा सुरू झाला असला तरी उष्णता, थंडी व पावसाचा एकत्र अनुभव येतोय. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला व विषाणूजन्य आजार झपाट्याने वाढत आहेत. -
सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय
हवामान बदलल्यावर लगेच सर्दी-खोकला होतो; पण घरातच असलेले हळद, मध, लिंबू व आले यांसारखे उपाय नैसर्गिकरीत्या आराम देतात. -
आले आणि मध
आले घशातील सूज आणि खवखव कमी करतो. तर मध नैसर्गिक कफ सिरपसारखो काम करतो. एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास खोकला कमी होतो. -
काळी मिरी आणि मध
काळ्या मिरीत असलेलं पाइपरिन संयुग घशाची जळजळ कमी करतं. काळ्या मिरी पावडरमध्ये थोडा मध मिसळून दिवसातून एक-दोन वेळा घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. -
हळदीचं दूध
हळदीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा हळद मिसळून प्यायल्यानं घसा शांत होतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. -
कोमट पाण्यात मिठाच्या गुळण्या
एका ग्लास कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्यास घशातील कफ आणि सूज कमी होते. हा उपाय दिवसातून २-३ वेळा केल्यास लक्षणं लवकर कमी होतात.
“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…