-
पुढच्या महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये वार्षिक डॉग सर्फिंग स्पर्धा होणार आहे.
या खास स्पर्धेत पाळीव श्वान पॅसिफिक महासागराच्या लाटांवर सर्फिंग करताना दिसणार आहेत.
ही मजेशीर स्पर्धा २ ऑगस्ट रोजी सॅन फ्रान्सिस्कोजवळील पॅसिफिक येथील लिंडा मार बीचवर होणार आहे. -
या स्पर्धेत श्वानांचे वजन लक्षात घेऊन वेगवेगळ्या गटात स्पर्धा घेतली जाणार आहे. काही गटांमध्ये एका बोर्डवर अनेक श्वानांना स्पर्धा करण्याची परवानगीदेखील आहे.
-
सर्फिंगशिवाय या एका दिवसाच्या कार्यक्रमात इतर मजेशीर गोष्टीही असतील. केसाळ श्वानांसाठी बीच फॅशन स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच, बचाव करणाऱ्या श्वानांना दत्तक घेण्याची मोहीमही राबवणार आहेत.
-
जगातील उत्तम डॉग सर्फर आणि नवीन स्पर्धकांना सुवर्णपदक जिंकण्यासाठी सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे, असं आयोजकांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर सांगितलं आहे.
-
राईड किती लांब आहे, लाट किती मोठी आहे आणि श्वान बोर्डवर किती स्थिर आहे, यावरून स्पर्धकांना गुण देण्यात येतील. त्याचबरोबर श्वानांचा आत्मविश्वासही पाहिला जाईल.
-
श्वानांनी सर्फबोर्डवर केलेल्या खास युक्त्या पाहून त्यांना गुण मिळतील.
अशा युक्त्यांमुळे त्यांच्या एकूण गुणांमध्ये बोनस पॉईंट्सची भर होईल. -
२०२३ मध्ये अमेरिकन पिट बुल टेरियर जातीचा १० वर्षांचा फेथ या श्वानाने चॅम्पियनशिप जिंकली होती. त्याने लाटांवर उत्कृष्ट सर्फिंग करत सर्वांची मने जिंकली.
-
ज्या स्पर्धांमध्ये मानव आणि श्वान दोघंही एकाच बोर्डवर असतात, त्यामध्ये मालक किंवा एखादा ठरवलेला सहाय्यक श्वानाला सुरुवात करून देऊ शकतो.
-
स्पर्धेदरम्यान श्वानाना पट्टा लावता येत नाही आणि त्यांना सर्फबोर्डला बांधता येत नाही.
म्हणून जर त्यांचा तोल गेला, तर ते सहज खाली पडू शकतात.

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्