-
आपण दररोज सकाळी टूथपेस्ट वापरतो, पण कधी विचार केला आहे का की ती तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते? फ्लोराईडसारखी रसायनं जी दातांना संरक्षण देतात, तीच हळूहळू शरीरावर घातक परिणाम करत आहेत.
-
पूर्वी फ्लोराईडचा वापर दात किडण्यापासून वाचवण्यासाठी केला जात असे. पण, आजच्या संशोधनानुसार ते मेंदू, हार्मोन्स आणि लहान मुलांच्या बौद्धिक विकासावरही परिणाम करू शकते. काही अभ्यासांनुसार, फ्लोराईडमुळे मुलांचा IQ कमी होण्याची शक्यता आहे.
-
संशोधन काय सांगतं?
एक अभ्यास दर्शवतो की ज्या गर्भवती महिलांच्या शरीरात फ्लोराईडचे प्रमाण अधिक होते, त्यांच्या मुलांमध्ये बौद्धिक विकासात अडथळा निर्माण झाला. भारतातील काही भागांत तर फ्लोरोसिससारखे आजारही दिसून येतात, ज्यामुळे दातांवर डाग आणि हाडांची कमजोरी निर्माण होते. -
टूथपेस्टमधील फ्लोराईड : लाभ की धोका?
फ्लोराईड दातांना किडपासून वाचवतो, पण जेव्हा ते गिळले जाते, तेव्हा ते शरीरात साचतं. लहान मुले टूथपेस्ट गिळण्याची शक्यता जास्त असते आणि त्यात फ्लोराईडचं प्रमाण पाण्यापेक्षा हजारोपट जास्त असतं. हे दीर्घकालीन नुकसान करू शकतं. -
उपाय काय?
स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असल्यास फ्लोराईड नसलेली टूथपेस्ट निवडा. बाजारात आता नैसर्गिक पर्याय सहज मिळतात. बेकिंग सोडा, नारळ तेल, कडुलिंब वापरून घरगुती टूथपेस्टही तयार करता येते. -
पिण्याच्या पाण्यातही फ्लोराईड मिसळलेलं असतं, त्यामुळे योग्य फिल्टर किंवा आरओ वापरणं गरजेचं आहे. चिंचेसारखे घरगुती उपायदेखील शरीरातून फ्लोराईड बाहेर टाकण्यास मदत करतात. टूथपेस्ट खरेदी करताना ‘फ्लोराईड फ्री’ आहे का हे नक्की तपासा.

Puja Khedkar: पूजा खेडकर यांचे ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचा निर्णय