-
तुम्ही सर्व घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये लाफिंग बुद्धाच्या विविध प्रकारच्या मूर्ती पाहिल्या असतील. अनेक वेळा ही मूर्ती तुम्हाला शुभेच्छा म्हणून मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींनी भेट दिली असेल.
-
पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की लाफिंग बुद्धा कोण होते आणि त्यांची मूर्ती इतकी शुभ का मानली जाते? ते नेहमी का हसत असतात?
-
लाफिंग बुद्ध कोण होते?
लाफिंग बुद्धा यांना होतेई किंवा पुताई म्हणूनही ओळखले जाते, ते एक बौद्ध भिक्षू होते ज्यांना चीन आणि जपानमध्ये सुखाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. -
ते का हसतात?
असे मानले जाते की बौद्ध धर्माची शिकवण प्राप्त केल्यानंतर होतेई यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर ते मोठ्याने हसू लागले. त्यांच्या हास्याने लोकांना आकर्षित केले आणि ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी लोकांना हसणे आणि आनंदी राहणे शिकवले. या कारणास्तव त्यांना जपानमध्ये ‘लाफिंग बुद्ध’ म्हटले जात असे. -
होतेई यांचे शरीर गुबगुबीत होते तसेच त्यांचे पोट मोठे होते.
-
जेव्हा ते लोकांमध्ये असायचे तेव्हा पोट दाखवून जोरजोरात हसायचे आणि वातावरण प्रसन्न करत असायचे.
-
ते जिथे जायचे तिथे लोकांना इतकं हसवायचे की तिथली नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होत असे.
-
लाफिंग बुद्धाचे महत्त्व
होतेई यांच्या अनुयायांनी त्यांचा अशा प्रकारे प्रचार केला की चीन आणि जपानचे लोक त्यांना देव मानू लागले आणि त्यांची मूर्ती बनवून घरात ठेवू लागले. कालांतराने लाफिंग बुद्धा हे सकारात्मक ऊर्जा, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाऊ लागले. -
त्यांची हसण्याची मुद्रा आणि गुबगुबीत शरीर नकारात्मकता दूर करते आणि घरात- कार्यालयात आनंदी वातावरण निर्माण करते. त्यांची मूर्ती घरात किंवा कामाच्या ठिकाणी ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो, जो आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो, असा समज रुढ झाला. (All Photos Source: Meta AI) हेही पाहा – 10 Most powerful Army: जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या यादीमध्ये भारतीय सैन्य कितव्या स्थानी?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दिला सुखद धक्का, शेअर केले साखरपुड्याचे फोटो, होणारी बायको आहे तरी कोण?