-
केळीबद्दल गैरसमज
अनेक लोकांना वाटतं की केळी खाल्ल्यामुळे वजन वाढतं. कारण ती गोड लागते आणि कार्बोहायड्रेट्सने भरलेली असते. मात्र, हे पूर्णपणे खरं नाही. (फोटो सौजन्य : FreePik) -
केळी म्हणजे नैसर्गिक ऊर्जा स्रोत
केळीमध्ये नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोस) असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा देते. व्यायामानंतर किंवा सकाळी ती खाल्ली, तर ती आरोग्यास चांगली ठरते. (फोटो सौजन्य : Pexels) -
फायबर्सचा उत्तम स्रोत
केळीत फायबर्स भरपूर असतात, त्यामुळे पचन सुधारतं, पोट भरलेलं वाटतं आणि ओवरईटिंगला आळा बसतो. हे वजन कमी करण्यात मदत करतं. (फोटो सौजन्य : Pexels) -
कमी फॅट, भरपूर पोषणमूल्यं
केळीत चरबी जवळपास नसतेच. त्यात व्हिटॅमिन B6, C, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी पोषकतत्त्वं भरपूर असतात. (फोटो सौजन्य : Pexels) -
मध्यम प्रमाणात खाणं फायदेशीर
कोणताही अन्नपदार्थ जास्त खाल्ल्यास तो शरीरावर विपरीत परिणाम करतो. केळीदेखील मध्यम प्रमाणात खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहतं. (फोटो सौजन्य : Pexels) -
वजन घटवण्यासाठी उपयोगी
योग्य वेळ आणि प्रमाणात केळी खाल्ल्यास ती वजन कमी करण्यास मदत करू शकते. विशेषतः वर्कआउटनंतर केळी खाल्ल्याने स्नायूंची झीज भरून निघते. (फोटो सौजन्य : Pexels) -
लो कॅलरी फळ
एक मध्यम आकाराचं केळं साधारणतः १०० कॅलरीचं असतं. हे फार जास्त नाही, विशेषतः जेव्हा तुम्ही अॅक्टिव्ह असता. (फोटो सौजन्य : Pexels) -
फायबर्समुळे मेटाबॉलिझम वाढतो
केळीत असलेले फायबर्स पचनक्रिया सुरळीत ठेवतात आणि मेटाबॉलिझमला चालना देतात, त्यामुळे चरबी साठण्याऐवजी ती जळते. (फोटो सौजन्य : Pexels) -
केळी वजन वाढवतं असा गैरसमज खोटा आहे. योग्य वेळ, प्रमाण आणि आहाराच्या संदर्भात केळी एक आरोग्यदायी फळ ठरू शकतं. (फोटो सौजन्य : Pexels)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक