रोजचा ताण, कामाचा गडबडलेला वेळ व मानसिक थकवा यांमुळे सुटीची गरज भासते. पण, प्रत्येक वेळी सुट्टी घेणं शक्य नसतं. अशा वेळी हे साधे उपाय तुमचं मन रिफ्रेश करतील. (फोटो सौजन्य : Pexels)सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहू नका उठता क्षणी मोबाईल हातात घेतल्यावर अनेक प्रकारची माहिती तुमच्या मनाचा ताबा घेत असते. त्याऐवजी काही वेळ स्वतःशी घालवा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. (फोटो सौजन्य : Pexels)डिजिटल डिटॉक्सचा सराव करा सततच्या स्क्रीन टाइममुळे मानसिक थकवा वाढतो. दररोज ठरावीक वेळ मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपपासून दूर राहा. निसर्गात फिरा किंवा एखादा छंद जोपासा. (फोटो सौजन्य : Pexels)मनापासून हास्य महत्त्वाचं हसणं हे मनासाठी एक नैसर्गिक औषध आहे. एखादी विनोदी मालिका पाहा, मजेशीर गोष्टी वाचा किंवा मित्रांसोबत हास्यविनोद करा. (फोटो सौजन्य : Pexels)ध्यानधारणा करा दररोज काही मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मन स्थिर होतं, विचार स्पष्ट होतात आणि एकाग्रता वाढते. (फोटो सौजन्य : Pexels) स्वतःसाठी वेळ ठेवा दिवसातून थोडा वेळ फक्त स्वतःसाठी असावा. या वेळात वाचन, चित्रकला, संगीत ऐकणं किंवा मनापासून आवडणारी कोणतीही गोष्ट करा. (फोटो सौजन्य : Pexels)नवीन कौशल्य शिका नवीन गोष्ट शिकल्याने मेंदू सतत सक्रिय राहतो. त्यामुळे कंटाळवाणेपणा दूर राहतो आणि आत्मविश्वास वाढतो. छोटा कोर्स, नवीन भाषा किंवा पाककला शिकायला सुरुवात करा. (फोटो सौजन्य : Pexels)निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा निसर्गाच्या संपर्कात राहिलं की, मन शांत होतं. बागेत फेरफटका, झाडांखाली बसणं किंवा फुलांकडे पाहणं यामुळेही मानसिक ताजेपणा मिळतो. (फोटो सौजन्य : Pexels) ‘नाही’ म्हणायला शिका सतत इतरांना खूश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला दडपून टाकू नका. स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि आवश्यक तेव्हा सौम्यपणे नकार द्या. त्यामुळे मानसिक ओझं कमी होतं. (फोटो सौजन्य : Pexels)